तरुण भारत

सांगलीत एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

प्रतिनिधी / सांगली

सांगली आगारात एसटी वाहक म्हणून सेवेत असणारे कवलापूर ता. मिरज येथील राजेंद्र निवृत्ती पाटील वय 42 यांचे गुरुवारी हृदय विकाराने निधन झाले.

ते सांगली आगारामध्ये कामास होते. पण एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपामुळे ते सध्या घरीच होते. अधिक माहितीसाठी संपात सहभागी असलेल्या पाटील यांच्या एसटी कर्मचारी बांधवांशी सम्पर्क साधला असता, काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेल्या बेकायदेशीर संपात सामील असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर राज्य शासनाने निलंबनाची कारवाई सुरू केली आहे.

त्या आशयाच्या बातम्या वारंवार येत आहेत. त्यामुळे निलंबनाच्या धास्तीने पाटील हे काही काळ त्रस्त होते. यामुळे त्यांना ह्रदय विकाराचा धक्का बसून त्यांचे निधन झाले आहे. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी मृत पावलेल्या कर्मचाऱ्यास न्याय मिळालाच पाहिजे, तरच त्यांच्या आत्म्यास शांती लाभेल, असे यावेळी स्पष्ट केले. पाटील यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून, कर्मचारी बांधवांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisements

Related Stories

लोकसहभागातून गावांचा विकास करा

Abhijeet Shinde

सांगली : मालगांवच्या जयहिंद सोसायटीवर पुन्हा संचालक मंडळ

Abhijeet Shinde

शिवाजी विद्यापीठातर्फे 50 गुणांची मॉकटेस्ट आजपासून

Abhijeet Shinde

पॉझेटिव्हीटी रेट खाली पण थंडी वाढली

Patil_p

नवाब मलिक यांनी सांगितलं शरद पवार-फडणवीस भेटीमागचं कारण

Abhijeet Shinde

सातारा पालिकेची आज सर्वसाधारण सभा

Patil_p
error: Content is protected !!