तरुण भारत

इस्लामपूर नगरपालिका : मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरुन सभा तहकूब

आनंदराव पवार यांचा आरोप : रस्ते अनुदान वितरीतचा निर्णय लांबणीवर : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने सभा तहकूब :विकास आघाडीच्या नगरसेवकांकडून निषेध

प्रतिनिधी / इस्लामपूर

Advertisements

महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाकडून ११ कोटींचा विशेष रस्ते अनुदानाचा निधी वितरीत करण्यासाठी इस्लामपूर नगरपालिकेत विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेकडे राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी पाठ फिरवली. त्यामुळे गणपुर्ती अभावी सभा तहकुब झाली, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत कलगीतुरा रंगला. या निधी वरून श्रेयवादाचे राजकारण तापले. महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाकडून ११ कोटींचा विशेष रस्ते अनुदानाचा निधी वितरीत करण्यासाठी इस्लामपूर नगरपालिकेत विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष निशिकांत पाटील होते. यावेळी मुख्याधिकारी वैभव साबळे यांची उपस्थिती होती.

राष्ट्रवादीला इस्लामपूर शहराचा विकास होत असलेला बघवत नाही. शहरातील राष्ट्रवादीच्या प्रभागात सुध्दा रस्ते अनुदान निधी दिला आहे. राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने मला फोन करुन सांगितले की, आम्हाला मोठया नेत्यांनी सभेस जाण्यास मज्जाव केला. असा आरोप पालकमंत्री जयंत पाटील यांचे नाव न घेता शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांनी केला. शिवसेना व विकास आघाडी तर्फे राष्ट्रवादीच्या या कृती निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे नगरसेवक या विशेष सभेसाठी का उपस्थित राहीले नाहीत, हे मला माहित नाही. या सभेचा कोरम पुर्ण करण्यासाठी १५ सदस्यांची आवश्यकता असते. दि. ३१ मार्च २०२२ च्या आत हा विशेष रस्ते अनुदानाचा ११ कोटींचा निधी खर्च होणे गरजेचे आहे. यासाठी ही विशेष सभा बोलवण्यात आली होती. शनिवार दि. १३ रोजी सकाळी साडे आकरा वाजता पुन्हा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पक्षप्रतोद विक्रम पाटील म्हणाले, शहराच्या विकासासाठी शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्यांसाठी ११ कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या डोळ्यात खुपत आहे.

पालिकेत आता पर्यंत रस्त्यांसाठी सर्वात मोठा निधी आला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भुयारी गटारला मंजूरी दिली. शकील सय्यद म्हणाले, आनंदराव पवार यांच्या प्रयत्नातून इस्लामपूर शहरासाठी ११ कोटींचा निधी आला आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. यापुर्वी ही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी रस्त्यांसाठी आलेला निधी दाबून ठेवला होता.

Related Stories

सांगली : मिरजेत लॉकडाऊनचा आदेश डावलून बाजार पेठा फुलल्या

Abhijeet Shinde

सांगली : वीज बिल वसुलीच्या विरोधात मिरजेत भाजपचे आंदोलन

Abhijeet Shinde

विधान परिषद पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ : उद्या मतमोजणी

Abhijeet Shinde

सांगली : मुलाच्या प्रवेशासासाठी पैसे मागितल्याने पतीने पत्नीलाच रिव्हॉलवरने धमकावले

Abhijeet Shinde

सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी महापौर

Abhijeet Shinde

मिरजेत 20 हजारांच्या बदल्यात साडेचार लाखांची मागणी; महिला सावकारांवर गुन्हा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!