तरुण भारत

देवसहायम पिल्लई यांना मिळणार ख्रिश्चन संतपद

2022 मध्ये व्हॅटिकन सिटीत होणार गौरव

वृत्तसंस्था / व्हॅटिकन सिटी

Advertisements

18 व्या शतकात ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे देवसहायम पिल्लई हे ख्रिश्चन संतपदाने सन्मानित होणारे पहिले भारतीय सामान्य व्यक्ती ठरणार आहेत. पोप फ्रान्सिस हे 15 मे 2022 रोजी व्हॅटिकनमधील सेंट पीटर्स बेसिलिकामध्ये संतपदाच्या घोषणेदरम्यान 6 अन्य संतांसोबत देवसहायम पिल्लई यांना संत म्हणून घोषित करणार आहेत.

व्हॅटिकनमध्ये कॉग्रिगेशन फॉर द कॉजेज ऑफ सेंट्सने ही घोषणा केली. प्रक्रिया पूर्ण होताच पिल्लई ख्रिश्चन संत होणारे भारताचे पहिले सामान्य व्यक्ती ठरणार आहेत. त्यांनी 1745 मध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यावर ‘लेजारुस’ असे नाव लावून घेतले होते. ‘लेजारुस’चा अर्थच ‘देवसहाय्यम’ किंवा ‘देवांना सहाय्य’ असा होतो.

धर्माचा प्रचार करताना त्यांनी विशेषकरून जातीय मतभेद बाजूला सारत सर्व लोकांच्या समानतेवर भर दिला. त्यांना 1749 मध्ये अटक करण्यात आली होती. 14 जानेवारी 1752 मध्ये गोळय़ा घालून ठार करण्यात आले होते असे व्हॅटिकनकडून म्हटले गेले आहे. देवसहायम यांचे जीवन आणि मृत्यूशी संबंधित ठिकाण तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्हय़ातील कोट्टार डायोसिसमध्ये आहे. देवसहायम यांना त्यांच्या जन्माच्या 300 वर्षांनी 2 डिसेंबर 2012 रोजी कोट्टारमध्ये ‘धन्य’ घोषित करण्यात आले होते. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1712 रोजी कन्याकुमारी जिल्ह्य़ातील नट्टलममध्ये एक हिंदू नायर कुटुंबात झाला होता. हा भाग तत्कालीन त्रावणकोर साम्राज्याचा हिस्सा होता.

Related Stories

माझा जीव घ्या पण मुलांना सोडून द्या

Patil_p

मॉडर्नाच्या 10 कोटी अतिरिक्त डोसची मागणी

Patil_p

जगभरातील बळींचा आकडा 50 हाजारांवर

Patil_p

न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये गोळीबार

datta jadhav

…तोपर्यंत कोरोना विषाणू फैलावत राहणार!

Patil_p

अमेरिकेत : तिसरी लाट

Patil_p
error: Content is protected !!