तरुण भारत

हिमालयात आलेत नवे अतिथी

पूर्व आफ्रिकेतून 8925 किलो मीटरचे अंतर कापून हिमालयात काही पक्षीरुपी अतिथी सध्या आले आहेत. हे पक्षी विशेष आहेत. हिमालयातील पाँग सरोवर परिसरात त्यांनी वास्तव्य केले असून बऱयाच वर्षांनी त्यांचे दर्शन या परिसरात घडले आहे. त्यामुळे त्यांचा अभ्यास करण्यासाठी पक्षी तज्ञांनीही बराच उत्साह दाखविला आहे. या पक्षाचे नाव अमूर फाल्कन असे असून त्याचे वजन अवघे 170 ग्रॅम असते. हा पक्षी सलग 120 तास म्हणजे पाच दिवस न थांबता उडू शकतो. पाँग सरोवर परिसरात यापूर्वी 2013 मध्ये त्यांचे दर्शन झाले होते.

हे पक्षी दुर्मिळ मानले जातात. मध्यंतरीच्या काळात तर ते नामशेष झाल्याची चिंता व्यक्त करण्यात येत होती. तथापि 2013 मध्ये त्यांचे दर्शन घडल्याने पक्षीप्रेमींचा जीव भांडय़ात पडला. यांचा उडण्याचा वेग प्रतितास 47 कि.मी. इतका असतो. हिमालयाच्या पूर्व भागात हिवाळय़ाच्या प्रारंभी त्यांचे आगमन होत असते. पृथ्वीचा जवळपास अर्धा परीघ पार करून ते भारतात येतात. 2013 मध्ये अवघे तीन अमूर फाल्कन पक्षी दिसले होते. यावेळी त्यांची संख्या थोडी जास्त आहे. पाँग सरोवर परिसरात सध्या विविध प्रकारच्या 30 हजार पक्षांचे आगमन झाले आहे. आगामी काही दिवसात अमुर फाल्कनची संख्या आणखी वाढणार आहे, असे पक्षी तज्ञांचे मत आहे. या पक्षांवर सध्या दुरून दृष्टी ठेवली जात आहे.

Advertisements

Related Stories

तुरुंगात भुयार खणून 6 कैदी फरार

Patil_p

तुर्कस्तान-फ्रान्स यांच्यात व्यंगचित्रयुद्ध

Omkar B

ट्रम्प यांच्या 18 रॅलींमधून 30 हजार जणांना कोरोनाची बाधा; 700 जणांचा मृत्यू

datta jadhav

पाकिस्तान : दुसरी लाट

Patil_p

‘मृत्यूच्या गुहे’त 6 हजार वर्षांपूर्वींचा सांगाडा

Patil_p

ऑस्ट्रेलियात भीषण पूर, लाखो लोकांचे स्थलांतर

Patil_p
error: Content is protected !!