तरुण भारत

कोल्हापूर शहरात उष्मा वाढला; पावसाच्या सरी कोसळल्या

हवामानात बदल; आरोग्यावर परिणाम

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम हवामानावर होत आहे. शनिवारी कोल्हापुरात हवामानात बदल झालेला पाहायला मिळाला. ढगाळ वातावरणामुळे सूर्यकिरणांची तीव्रता कमी होती. वातावरणात सकाळी थोडी उष्णताही जाणवत होती. दुपारी अड़ीचच्या सुमारास शहरात साधारण वीस मिनिटे पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. अचानक पडलेल्या सरींमुळे पादचारी, दुचाकी वाहनधारकांची तारांबळ उडाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोल्हापुरात आणखी काही दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

ढगाळ वातावरणामुळे शुक्रवारी रात्री हवेत गारठा नव्हता. रात्री उष्मा वाढला. शनिवारी सकाळीही उष्मा जाणवता होता. दुपारच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण होत पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाच्या आगमनाने दाभोळकर कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, तसेच शहरात ठिकठिकाणी दुचाकीधारक, पादचाऱयांनी दुकानांचा आसरा घेतला. एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱयांनी मध्यवर्ती बसस्थानक आणि आगारात उभ्या राहिलेल्या एसटी गाड्यात जाऊन आसरा घेतला. नुकतीच थंडी सुरू झाली होती. तोवर अचानक हवामानात बदल झाला. ढगाळ वातावरण, उष्मा आणि पाऊस या बदलत्या हवामानामुळे आरेग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Related Stories

कर्नाटकातून विनापरवाना आलेल्या तरुणांवर कारवाई

Abhijeet Shinde

कोल्हापूर : आपत्कालीन स्थितीत प्रशासनाचे वळीवडेकडे दुर्लक्ष का ?

Abhijeet Shinde

कोल्हापुरात दोघे कोरोना बाधित, जांभळेवाडी, जयसिंगपुरातील तरूण पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

जिल्ह्यात एकूण २८६ पॉझिटिव्ह, शाहूवाडी सर्वाधिक ९५

Abhijeet Shinde

जाखलेत विवाहितेची विहिरीत उडी घेत आत्महत्या

Sumit Tambekar

रस्ते करतानाच आता राहणार ‘वॉच’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!