तरुण भारत

ऑस्ट्रीयात कोरोनाविषयी खबरदारी अंशतः लॉकडाऊन जारी

व्हीएन्ना

 कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या ऑस्ट्रीयातील लोकांना आता सतर्कता बाळगण्याची गरज लागणार आहे. लक्षावधी लस न घेतलेल्या लोकांना सरकारने घरीच राहण्याचे निर्देश दिल्याचे कळते. त्यामुळे आता लस न घेतलेल्यांना लसीचे महत्त्व समजू शकणार आहे. ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही त्यांना आता नव्या आदेशामुळे आता घरी बसावं लागणार आहे. देशात लस न घेतलेल्यांसाठी पुन्हा लॉकडाऊनची सक्ती केली जाणार आहे. सध्याला देशातील लसीकरणाचा वेग खूपच कमी आहे. येत्या काही दिवसात पुन्हा कोरोना पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अनुषंगाने खबरदारी म्हणून ऑस्ट्रीयन सरकारने नवा आदेश जारी केल्याचे समजते. मध्य युरोपमध्ये कोरोना लाटेचा प्रसार झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने खबरदारी घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नेदरलँडमध्ये पुढील तीन आठवडे अंशतः लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. तेथे वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकार खडबडून जागे झाले आहे. काळजीवाहू पंतप्रधान मार्क रुटी यांनीही रेस्टॉरंटस्, सुपरमार्केटस् व इतर बिगर महत्त्वाच्या रिटेल दुकानांना लवकर आपले व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले असून समाजिक अंतराचीही सक्ती जारी केली आहे.

Advertisements

Related Stories

दक्षिण कोरियाच्या अधिकाऱयाची हत्या

Patil_p

काबूल विमानतळ स्फोट ; याचा हिशेब चुकता करु : जो बायडेन

Abhijeet Shinde

अमेरिकेचा इशारा, पाकिस्तान धास्तावला

Patil_p

फ्रान्समध्ये धार्मिक कट्टरवाद्यांवर मोठी कारवाई

Omkar B

चीनकडून दुष्प्रचार

Patil_p

कोरोनाचा शिक्षणावर प्रतिकूल परिणाम

Patil_p
error: Content is protected !!