तरुण भारत

जागतिक खाद्य कार्यक्रमासाठी अभिनेता डॅनियल ब्रुल सदिच्छा दूत

लंडन

 स्पॅनिश-जर्मन लोकप्रिय अभिनेता डॅनियल ब्रुल यांची संयुक्त राष्ट्र जागतिक खाद्य कार्यक्रमाच्या सदिच्छा दूतपदी निवड करण्यात आली आहे. जागतिक खाद्य कार्यक्रमासंबंधीच्या बैठकीत सदरची निवडीची माहिती देण्यात आली. रश, गुड बाय लेनीन आणि मार्वल सिनेमॅटीक युनिव्हर्स यासारख्या चित्रपटात डॅनियल ब्रुल यांनी भूमिका केली आहे. जागतिक स्तरावर ते आता एका महत्त्वाच्या पदावर कार्यरत होणार असून जगभरातील विविध देशातील उपासमारी कमी करण्यासंबंधीचे कार्य ते आगामी काळात करणार आहेत. अभिनेते डॅनियल बुल म्हणाले की, हवापाणी बदलाचे संकट सर्वच देशांवर घोंघावत आहे. याने जगात उपासमारीचे संकट उभे राहणार आहे. तेव्हा याबाबतीत माझ्यासह सर्वांचीच जबाबदारी वाढणार आहे. सदिच्छा दूतच्यानिमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेकडून मिळालेली जबाबदारी सर्वंकशपणे निभावणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संघटनेचे कार्यकारी संचालक डेव्हीड बिस्ले यांनी अभिनेते डॅनियल यांचे अभिनंदन केले आहे. महत्त्वाच्या मोहिमेसाठी अभिनेते डॅनियल यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे बिस्ले यांनी म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

भविष्यात आकारला जाऊ शकतो हीट टॅक्स

Patil_p

फ्रान्समध्ये कोरोना संसर्ग पुन्हा तीव्र

Patil_p

नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे एकत्रीकरण रद्द

Patil_p

लसीसाठी WHO ने भारताकडे मागितली मदत

datta jadhav

हुवाईच्या सीएफओंच्या सुटकेनंतर 2 नागरिकांची चीनकडून सुटका

Patil_p

कोरोनाच्या नव्या स्वरुपामुळे जगभरात धास्ती

Patil_p
error: Content is protected !!