तरुण भारत

प्रियोळातील कार्यकर्त्यांना धमकी व मारहाण

स्वाभिमानी प्रियोळकर संघटनेचा आरोप

प्रतिनिधी /फोंडा

Advertisements

प्रियोळ मतदार संघात काही राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडून संदीप निगळय़े यांच्यासाठी प्रचारकार्य करणाऱया कार्यकर्त्यांवर दबावतंत्र वापरुन धमक्या दिल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी दोघा कार्यकर्त्यांना मारहाण करुन त्यांचे मोबाईल फोनही हिसकावून घेतल्याचा आरोप स्वाभिमानी प्रियोळकर या संघटनेने केला आहे. संघटनेचे पदाधिकारी व सावईवेरेचे पंचसदस्य महेश शिलकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या कार्यकर्त्यांना धमकावण्यामागे व मारहाण करण्यात साध्या वेशातील पोलिसांचा वापर केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

प्रियोळ मतदार संघातील ही दडपशाही बंद न झाल्यास आम्हालाही योग्य पावले उचलावी लागतील असा इशारा स्वाभिमानी प्रियोळच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यावेळी भाजपाचे पदाधिकारी सतीश मडकईकर, मंगलदास प्रियोळकर, महेश खेडेकर, विनय नाईक, निळकंठ नाईक, राजेंद्र नाईक, सुहास नाईक तसेच अनुप देसाई हे उपस्थित होते. प्रियोळात मागील तीन निवडणुका मतदार संघाबाहेरील उमेदवाराला आमदार म्हणून निवडून देण्यात आले. यंदा स्थानिक उमेदवार असावा यासाठी भाजपातील काही समविचारी कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी प्रियोळकर या बॅनरखाली उद्योजक संदीप निगळय़े यांना उमेदवार म्हणून उभे केले आहे. त्यांना मतदारांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून काही प्रतिस्पर्धी बिथरले आहेत. त्यातूनच त्यांनी कार्यकर्त्य़ांवर धमकी व दबावतंत्र सुरु केले आहे, असे सतीश मडकईकर यांनी सांगितले. संदीप निगळय़े हे भाजपाचे जुने कार्यकर्ते असून त्यांना भाजपाने प्रियोळची उमेदवारी द्यावी असा आमचा आग्रह असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली व त्यांचे मोबाईल संच हिसकावून घेण्यात आले, त्यांच्याविरोधात पोलीस तक्रार करणार असल्याचेही मडकईकर यांनी सांगितले.

Related Stories

प्रथम लेखी पुरावे सादर करावे, अन्यथा अब्रुनुकसान भरपाई द्यावी

tarunbharat

सत्तरीतील कणग्या,सुरण लागवडीवर सांळीदर प्राण्याचा आघात.

Patil_p

लसिकरण कार्यक्रमातील गैरव्यवस्थापन महागात पडणार

Amit Kulkarni

विलास मेथर खून प्रकरणी चौघांना अटक

Patil_p

अर्भकाच्या मृतदेहासंबंधी चौकशी करण्याची मागणी

Omkar B

दिल्लीत देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ

Amit Kulkarni
error: Content is protected !!