तरुण भारत

चोरी प्रकरणाचा चार दिवसात छडा

दोघा जणांना अटक, सव्वादोन लाखाचा ऐवज जप्त

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

शिवबसवनगर येथे राहणाऱया एका वैद्यकीय विद्यार्थ्याच्या घरी चार दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती. माळमारुती पोलिसांनी चार दिवसातच या प्रकरणाचा छडा लावून दोघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 2 लाख 24 हजार 200 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी ही माहिती दिली. बुधवार दि. 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 ते 7.50 या वीस मिनिटात अग्वाहे माघ, मूळचा राहणार नागालँड, सध्या राहणार शिवबसवनगर या वैद्यकीय विद्यार्थ्याच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरी करण्यात आली होती.

चोरटय़ांनी किमती कॅमेरा, मनगटी घडय़ाळे, हेअरवॅक्स, परफ्युम व किमती बूट जोडी असा 2 लाख 24 हजार 200 रुपये किमतीचा ऐवज चोरला होता. पोलिसांनी सुभाषनगर व उज्ज्वलनगर येथील दोन तरुणांना अटक करून ऐवज जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.

Related Stories

क्रीडा भारतीचे योगदान कौतुकास्पद : प्रसाद महानकर

Amit Kulkarni

सेवाभावी संस्थांच्या मदतीचे मनपाच्या माध्यमातून वितरण

Patil_p

देशाच्या विकासात भ्रष्टाचाराचा अडथळा

Omkar B

बेळगाव जिह्यात शुक्रवारी 76 जणांना कोरोनाची बाधा

Rohan_P

शेतकऱयांच्या हितासाठी दोन्ही मार्केट सुरू ठेवा

Amit Kulkarni

आरएसएसचे राजशेखर हिरेमठ यांचे निधन

Patil_p
error: Content is protected !!