तरुण भारत

गोवा मद्य वाहतुक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तस्कराला अटक; 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी विभागीय कार्यालयाची कारवाई

इचलकरंजी / प्रतिनिधी

Advertisements

कबनूर ता. हातकणंगले नजीक गोवा बनावटीच्या मद्याची अवैधपणे वाहतुक करणाऱ्या तवेरा गाडीसह फोंडा घाट, नवीन कुरली येथील ता. कणकवली, जि . सिंधूदुर्ग येथील एका दारु तस्कराला अटक केली. अविनाश अनंत मोहित वय 34, रा . फोंडा घाट नवीन कुरली बाजारपेठ जवळ, ता. कणकवली, जि . सिंधूदुर्ग असे मद्य तस्कराचे नाव आहे.

त्याच्याकडून गोवा बनावटीच्या गोल्डन ए सीई ब्लू फाईन व्हिस्की या विदेशी मद्याच्या 750 मिलीचे 75 बॉक्स आणि एम एच – 04 – एआर- 1649 या क्रमांकाची तवेरा गाडी असा 8 लाख 39 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई राज्य दारु उत्पादन शुल्क खात्याच्या इचलकरंजी विभागीय अधिकाऱ्यानी सोमवारी पहाटे केली आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कचे इचलकरंजी विभागाचे निरिक्षक पांडूरंग पाटील यांनी दिली.

निरिक्षक पाटील म्हणाले, कबनुर परिसरातून चार गाडीमधून गोवा बनावटीच्या मद्याची अवैधपणे वाहतुक होणार आहे. अशी माहिती मिळाली. त्यावरुन कबनूर गावानजीक नाकाबंदी करुन, इचलकरंजीकडे येणाऱ्या तवेरा गाड्या अडवून त्याची तपासणी सुरु केली होती. याच दरम्यान भरधावपणे एक तवेरा गाडी येत असल्याचे दिसून आले. त्यावरून ही गाडी थांबविण्याबाबत गाडीच्या चालकाला इशारा केला. तरी देखील या गाडीच्या चालकाने याकडे दुर्लक्ष करुन गाडी न थांबविता जावू लागला. यावेळी नाकाबंदीवरील राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या गाडीचा संशयावरून पाठलाग केला. कबनूरनजीक गाडीची तपासणी केली असता या गाडीत लपवलेल्या गोवा बनावटी दारुची गोल्डन एसीई ब्लू फाईन व्हिस्की या विदेशी दारुचे 750 मिलीचे 75 बॉक्स मिळून आले. ही दारु आणि तवेरा गाडी जप्त करीत, तवेराचा चालक अविनाश अनंत मोहित (वय 34, रा . फोंडा घाट नवीन कुरली बाजारपेठ जवळ, ता. कणकवली, जि . सिंधूदुर्ग याला अटक केली.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार, राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूरचे अधीक्षक रविंद्र आवळे, उपअधीक्षक श्री . दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य उत्पादन शुल्कचे इचलकरंजी विभागाचे निरिक्षक पांडूरंग पाटील, दुय्यम निरीक्षक राहूल गुरव, जवान पी . डी . कुडवे, बी . आर . पाटील , एस . डी . माने , एस . एस . कंठे , प्रसन्नजीत दिक्षांत आदीनी भाग घेतला. पुढील तपास निरीक्षक पांडूरंग पाटील करीत आहे .

Related Stories

अपहरणाच्या प्रयत्नात असलेल्या दोघा इसमांच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका

Abhijeet Shinde

साऊंड सिस्टीम लावल्याचा कारणातून तरुणाचा भोसकून खून

Abhijeet Shinde

गॅसवाहिनीसाठी फातोर्डातील रस्ते खोदण्यास परवानगी देऊ नये

Patil_p

महापुराच्या प्रश्नावर महाराष्ट्र व कर्नाटक मुख्यमंत्री भेटणार

Abhijeet Shinde

राम मंदिराच्या भूमीपूजनाला तूर्तास ब्रेक

prashant_c

सातारा शहरात रात्री आठलाच शटर डाऊन

Patil_p
error: Content is protected !!