तरुण भारत

ड्रुम टेक्नॉलॉजीचा येणार आयपीओ

गुरुग्राम

 ऑनलाइन कार खरेदी-विक्री प्लॅटफॉर्म ड्रुम टेक्नॉलॉजी आपला आयपीओ आणण्याची तयारी करते आहे. कंपनीने यासाठी आपला सविस्तर कागदपत्रांसहचा अर्ज बाजारातील नियामक सेबीकडे सादर केल्याचे कळते.

Advertisements

डुम टेक्नॉलॉजी लवकरच भारतीय शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी इच्छुक आहे. बाजारात लिस्टींग होण्याअगोदर आयपीओ सादर करण्याची योजना कंपनीने आखली आहे. सदरच्या आयपीओअंतर्गत कंपनी 2 हजार कोटी रुपयांचे नवे इक्विटी समभाग सादर करणार आहे. तसेच ड्रुम पीटीई लिमिटेडमार्फत कंपनी 1 हजार कोटी रुपयांचे इक्विटी समभाग विक्रीकरीता बाजारात आणणार आहे. 

ओळख कंपनीची

ड्रुम ही कंपनी संदीप अग्रवाल यांनी 2014 मध्ये गुरुग्राममध्ये स्थापन केली.  ते कंपनीचे संस्थापक व सीईओ आहेत. याआधी संदीप अग्रवाल हे शॉपक्लुजमध्ये कार्यरत होते. ड्रुम या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जुन्या, नव्या दुचाकी-चारचाकी गाडय़ांची खरेदी व विक्री करता येण्याची सोय आहे. ऑनलाइन खरेदी-विक्री बाजारपेठेत कंपनीचा हिस्सा 65 टक्के असल्याचे समजते.

Related Stories

चीनला आणखी एक धक्का; हिरो सायकलने रद्द केला 900 कोटींचा करार

datta jadhav

बर्जर पेंटस्ने किमती वाढवल्या

Patil_p

भेलला मिळाले प्रकल्पाचे कंत्राट

Patil_p

माहगाईचा उच्चांक

Omkar B

बँक ऑफ इंडियाचा नफा 100 टक्क्यांनी मजबूत

Patil_p

जिओ-एअरटेलच्याही पुढे व्होडाफोन-आयडिया

Patil_p
error: Content is protected !!