तरुण भारत

अंगणवाडी कार्यकर्त्यांचा अपमान टाळा

नोकर संघटनेचे अधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

पोषण अभियानांतर्गत गेल्या दोन वर्षांपासून काही कार्यक्रम हाती घेण्यात आले असून त्यामुळे अंगणवाडी कार्यकर्त्यांवरील कामाचा भार वाढला आहे. अंगणवाडी कार्यकर्त्यांना यासाठी साडय़ा वाटण्यात आल्या आहेत. अपमान टाळण्यासाठी त्या परत घ्याव्यात, अशी मागणी कर्नाटक राज्य अंगणवाडी नोकर संघटनेने केले आहे.

सोमवारी येथील महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. संघटनेच्या तालुका अध्यक्षा मंदा नेवगी, सुनीता तुंबरे, मीरा मोरे, महादेवी परीट, रुक्मिणी पाटील, मोनाक्का पाटील, शैलजा कुलकर्णी, सुषमा रजपूत, गीता उदगडगी, वंदना चव्हाण, कमल मेलगे आदींसह संघटनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

गणवेशासाठी दिलेल्या साडय़ांवर जाहिरातबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांच्या हक्कांचे उल्लंघन करण्यात आले आहे. जाहिरातबाजी असणाऱया साडय़ा खात्याने त्वरित मागे घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

हत्तीच्या पिलाला पुनीत राजकुमार यांचे नाव

Sumit Tambekar

अन् त्याची शर्यत थांबली…!

Amit Kulkarni

तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक कार्यशाळा उत्साहात

Patil_p

बेळगावात तीन अधिकाऱयांना दणका

Amit Kulkarni

बेळगावात एकाच दिवशी जैन मुनी यांना यमसल्लेखन पूर्वक तर आर्यिका यांचे समाधी मरण

Patil_p

रसिक रंजनतर्फे आज ‘पहाडी’ संगीत कार्यक्रम

Amit Kulkarni
error: Content is protected !!