तरुण भारत

देशाला मिळणार पहिला समलैंगिक न्यायाधीश

कॉलेजियमने केंद्राला पाठविला प्रस्ताव – यापूर्वी 4 वेळा आक्षेपासह फेटाळला जाण्याचा प्रकार

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

Advertisements

देशाला लवकरच पहिला समलैंगिक न्यायाधीश मिळू शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने वरिष्ठ विधिज्ञ सौरभ कृपाल (49 वर्षे) यांची दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमना यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमच्या 11 नोव्हेंबर रोजीच्या बैठकीत ही शिफारस करण्या आली.

केंद्र सरकारकडून चारवेळा कृपाल यांच्या नावावर आक्षेप घेण्यात आल्यावरही कॉलेजियमने स्वतःची शिफारस केली आहे. पण कृपाल यांची नियुक्ती कधीपर्यंत होणार हे अद्याप स्पष्ट नाही, कारण केंद्र सरकार कॉलेजियमला समीक्षा करण्यास सांगू शकते.

उघडपणे स्वतःला समलैंगिक म्हणून घोषित करणाऱया व्यक्तीला न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची सर्वोच्च न्यायालयाने शिफारस करण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये दिल्ली उच्च न्यायालय कॉलेजियमने सर्वसंमतीने न्यायाधीश म्हणून त्यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने चारवेळा त्यांच्या शिफारसीचा निर्णय टाळला होता.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून कृपाल यांच्या पार्श्वभूमीविषयी इनपूट मागविला असता सरकारने इंटेलिजेन्स ब्युरोच्या अहवालाचा दाखला दिला होता. आयबीने कृपाल यांच्या फेसबुक पोस्टचा दाखला दिला होता, ज्यात ते विदेशी जोडीदारासोबत दिसून येत होते.

विदेशी जोडीदारावरून आक्षेप

मार्च महिन्यात तत्कालीन सरन्यायाधीश बोबडे यांनी केंद्राकडून कृपाल यांना उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याविषयीची भूमिका जाणून घेतली होती. पण केंद्राने पुन्हा एकदा यावर आक्षेप नोंदविला होता. कृपाल यांच्या विदेशी जोडीदाराबद्दल सरकारने चिंता व्यक्त केली होती. कृपाल यांचे जोडीदार मानवाधिकार कार्यकर्ते निकोलस जर्मेन बाकमॅन असून ते स्वीत्झर्लंडचे नागरिक आहेत. याचमुळे केंद्र सरकारला राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित चिंता जाणवत आहे.

सौरभ कृपाल यांची पार्श्वभूमी

सौरभ कृपाल हे माजी सरन्यायाधीश बी.एन. कृपाल यांचे पुत्र आहेत. सौरभ हे कमर्शियल लॉचे तज्ञ आहेत. दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळविली असून ऑक्सफोर्ड विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी सुमारे 20 वर्षे प्रॅक्टिस केली आहे. समलैंगिक आणि एलजीबीटीक्यूंच्या अधिकारांसाठी ते आवाज उठवत असतात.

अमेरिका अन् ब्रिटनमधील स्थिती

बेथ रॉबिन्सन, अमेरिका

रॉबिन्सन यांना 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या फेडरल सर्किट कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्या फेडरल अपील कोर्टाच्या पहिल्या समलैंगिक महिला न्यायाधीश आहेत.

सर टेरेन्स ईथरटन, ब्रिटन ईथरटन यांनी सप्टेंबर 2008 मध्ये लॉर्ड जस्टिस ऑफ अपीलची शपथ घेतील होती. ते ब्रिटनचे पहिले घोषित समलैंगिक लॉर्ड जस्टिस ऑफ अपील आहेत.

Related Stories

उत्तराखंडात आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव

Rohan_P

कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वी

Patil_p

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं निधन

Abhijeet Shinde

उत्तराखंडात 491 नवे कोरोना रुग्ण; 12 मृत्यू

Rohan_P

गर्भवतींच्या लसीकरणासंदर्भात केंद्राला आदेश

Patil_p

राजधानी दिल्लीत 1,904 नवे कोरोना रुग्ण; 06 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!