तरुण भारत

भ्रष्टाचार प्रकरणी नेतान्याहू सुनावणीस उपस्थित

वृत्तसंस्था/ जेरूसलेम

इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी मंगळवारी न्यायालयात हजेरी लावली आहे. त्यांचे जवळचे सहकारी राहिलेले नीर हेफेत्ज भ्रष्टाचाराच्या एका मोठय़ा प्रकरणात नेतान्याहू यांच्या विरोधात साक्ष देण्याची तयारी करत असताना ही सुनावणी झाली आहे.

Advertisements

ही बहुप्रतीक्षित साक्ष आता पुढील आठवडय़ापर्यंत टाळण्यात आली आहे. नेतान्याहू यांच्या वकिलांनी या साक्षीला कायदेशीर आव्हान दिले आहे. नेतान्याहू यांच्या विरोधातील खटल्यात हेफेत्ज हे सरकारी पक्षाचे महत्त्वाचे साक्षीदार आहेत.

हेफेत्ज यांनी नेतान्याहू सरकारचे प्रवक्ते म्हणून काम करण्यासाठी 2009 मध्ये पत्रकारितेतील स्वतःची प्रदीर्घ कारकीर्द सोडून दिली होती. 2014 मध्ये ते नेतान्याहू यांच्या कुटुंबाचे प्रवक्ते आणि सल्लागार झाले होते.

मंगळवारच्या सुनावणीत नेतान्याहू हे एक वकील, स्वतःचा मुलगा आणि लिकुड पक्षाच्या काही समर्थकांसह उपस्थित राहिले. नेतान्याहू यांच्या पत्नीने हॉलिवूडचे निर्माते अर्नोन मिलचन आणि ऑस्ट्रेलियन अब्जाधीश जेम्स पॅकर यांच्याकडून भेटवस्तू म्हणून एक महागडे कंकण स्वीकारले होते असा आरोप नव्या साक्षीदाराने केला आहे. हेफेत्ज यांनी साक्ष देण्यापूर्वी माजी पंतप्रधानांना पुराव्यांचे अध्ययन करण्याची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद नेतान्याहू यांच्या वकिलांनी केला. यावर न्यायालयाने हेफेत्ज यांची साक्ष सोमवारपर्यंत स्थगित केली आहे. नेतान्याहू यांच्यावर तीन विविध प्रकरणांमध्ये फसवणूक, विश्वासघात करणे आणि लाचखोरीचा आरोप करण्यात आला आहे.

Related Stories

चीन महापुराच्या विळख्यात

Patil_p

तुर्कस्तानला अमेरिकेकडून निर्बंधांची धमकी

Patil_p

ट्रम्प-बायडन अटीतटीचा संग्राम

Omkar B

फ्रान्समध्ये 11 मे पर्यंत लॉक डाऊन

prashant_c

सोल शहर : कोविड-19 युद्धक्षेत्र

Patil_p

पदक निश्चित! रवीकुमार दहियाचा अंतिम फेरीत प्रवेश

datta jadhav
error: Content is protected !!