तरुण भारत

माजी खा. राजू शेट्टींच्या भगीनीच्या बंगल्यात चोरी

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ येथील माजी खासदार राजू शेट्टी यांच्या भगिनी सुरेखा आण्‍णासो पाटिल पाटील यांच्या बंगल्यात तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरी केल्याची घटना मंगळवार दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी अंदाजे चार लाख रुपये रोख पंधरा तोळ्याचे दागिने लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Advertisements

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, शिरोळ-अर्जुनवाड रोडवरील माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर राहणाऱ्या त्यांच्या भगिनी सुरेखा पाटील या आपल्या घरास कुलूप लावून काही कामानिमित्त माजी खासदार शेट्टी यांच्या घरी आल्या होत्या. घरात कोणी नसल्याचे पाहून अज्ञात 25 ते 30 वयोगटातील तीन ते चार चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील तिजोरी फोडून रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. यामध्ये अंदाजे रोख चार लाख रुपये 15 तोळ्याचे सोन्याचे दागिने यासह अन्य किमती वस्तूंवर चोरट्यांनी डल्ला मारला असल्याचे समजते.

Related Stories

कोल्हापूर : अलमटृी धरणाच्या उंचीविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Abhijeet Shinde

पेठ वडगाव : आ. गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ प्रतिमेस दुग्धाभिषेक

Abhijeet Shinde

चुकीच्या पिक पंचनाम्यास शेतकऱ्यांचा विरोध

Abhijeet Shinde

विधान परिषद : कोल्हापुरात सतेज पाटील-महाडिक गट आमने-सामने

Sumit Tambekar

सांगरूळ येथे शेतकऱ्यांच्या सहकार्याने कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : निळे येथील विवाहितेचा मृतदेह नदी पात्रात आढळला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!