तरुण भारत

चाईल्ड पोर्नोग्राफी विरोधात सीबीआयची कारवाई

14 राज्ये-केंद्रशासित प्रदेशामंध्ये छापे

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

Advertisements

मुलांच्या अश्लील चित्रफिती तयार करून त्यांना शेअर केल्याप्रकरणी सीबीआयने मंगळवारी देशातील 76 ठिकाणी छापे टाकले आहेत. मंगळवारी सकाळपासून देशातील 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 76 शहरांमध्ये शोधमोहीम चालविली जात आहे. 14 नोव्हेंबर रोजी याप्रकरणी 83 आरोपींच्या विरोधात 23 एफआयआर नोंदविण्यात आले होते, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली.

मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, दिल्ली, उत्तरप्रदेश, पंजाब, बिहार, ओडिशा, तामिळनाडू, राजस्थान, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेशात विविध ठिकाणी आरोपींच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहेत. मध्यप्रदेशातील 3 मोठय़ा शहरांमध्येही छाप्यांची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सायबर गुन्हय़ांच्या प्रमाणात वाढ

नॅशनल क्राईम रिकॉर्ड्स ब्युरोकडून अलिकडेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात मुलांच्या विरोधातील सायबर गुन्हय़ांचे प्रमाण 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 400 टक्क्यांनी वाढले आहे. यातील बहुतांश गुन्हे हे लैंगिक कृत्यांमध्ये मुलांना दाखविणाऱया सामग्रीचे प्रकाशन आणि प्रसारणाशी संबंधित आहेत.

सर्वाधिक 170 प्रकरणे उत्तरप्रदेशात नोंद

एनसीआरबीच्या 2020 च्या आकडेवारीनुसार मुलांच्या विरोधात झालेल्या ऑनलाईन गुन्हय़ांची सर्वाधिक 170 प्रकरणे उत्तर प्रदेशात नोंद झाली आहेत. उत्तर प्रदेशनंतर कर्नाटक आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तेथे मुलांच्या विरोधात झालेल्या ऑनलाईन गुन्हय़ांचे प्रमाण अनुक्रमे 144 आणि 137 इतके राहिले आहे. केरळ (107) आणि ओडिशा (71) या यादीत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे.

केवळ बालतस्करी आणि बालशोषणच नव्हे तर चाईल्ड पोर्नोग्राफी रोखण्यावरही लक्ष देण्याची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश यू. यू. ललित यांनी मागील महिन्यात म्हटले होते.

Related Stories

कर्नाटक: शिक्षणमंत्र्यांनी ‘विद्यागम’ योजनेचा घेतला आढावा

Abhijeet Shinde

रयतच्या जनरल बॉडी सदस्यपदी माजी आमदार सदाशिव पाटील

Abhijeet Shinde

मगो फुटीर आमदारांविरोधातील अपात्रता याचिका आता 26 रोजी

Patil_p

रस्ते निर्मनुष्य, गल्ल्याही शांत !

Patil_p

जम्मू-काश्मीरच्या औद्योगिक विकासासाठी केंद्रीय क्षेत्र योजनेला सरकारची मान्यता

Abhijeet Shinde

पेठ वडगाव : शिवसेनेच्यावतीने चीनचा राष्ट्रध्वज जाळून तीव्र निषेध

Abhijeet Shinde
error: Content is protected !!