तरुण भारत

बीएसएफचे अधिकारक्षेत्र वाढविण्याच्या विरोधात प्रस्ताव

ममता सरकारकडून प्रस्ताव संमत – तृणमूल आमदाराच्या टिप्पणीवरून गोंधळ

वृत्तसंस्था / कोलकाता

Advertisements

पश्चिम बंगाल विधानसभेत मंगळवारी बीएसएफचे अधिकारक्षेत्र वाढविण्याच्या निर्णयाच्या विरोधात प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. भाजपच्या आमदारांनी ममता बॅनर्जी सरकारकडून मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला विरोध केला. केंद्राच्या निर्णयाच्या विरोधात विधानसभेत प्रस्ताव संमत करणारे पश्चिम बंगाल हे पंजाबनंतरचे दुसरे राज्य आहे. प्रस्तावाच्या बाजूने 112 तर विरोधात 63 मते पडली आहेत.

हा प्रस्ताव राज्याचे संसदीय कामकाजमंत्री पार्थ चटर्जी यांनी सादर केला. केंद्राने आपला निर्णय त्वरित मागे घ्यावा, कारण बीएसएफचे अधिकारक्षेत्र वाढविणे म्हणजे देशाच्या संघीय प्रणालीवर थेट हल्ला असल्याचे ते म्हणाले.

प्रस्तावावरील चर्चेदरम्यान तृणमूल आमदार उदयन गुहा यांच्या एका टिप्पणीमुळे मोठा गोंधळ झाला. बीएसएफने मृतदेहाच्या झडतीच्या नावाखाली एखाद्या महिलेला गैरहेतूने स्पर्श केल्यास पाहिल्यावर सीमावर्ती भागात राहणारा मुलगा कधीच देशभक्त होणार नसल्याची वादग्रस्त टिप्पणी गुहा यांनी केली. भाजप आमदारांनी या टिप्पणीला विरोध करत ती कामकाजातून हटविण्याची मागणी केली.

बीएसएफसारख्या सुरक्षा दलाच्या विरोधात अशाप्रकारच्या भाषेचा वापर पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. केंद्र सरकार जंगलमहलमधून केंद्रीय सुरक्षा दलांना मागे घेण्याचा प्रयत्न करते, तेव्हा हेच राज्य सरकार त्याला विरोध करते आणि आता हेच सरकार बीएसएफच्या कारवाईला विरोध करतेय. नव्या निर्णयामुळे राज्य पोलीस आणि बीएसएफ यांच्यात वाद होण्याचा प्रश्नच नसल्याचे विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी म्हटले आहे.

3 राज्यांमध्ये वाढले बीएसएफचे अधिकार

केंद्रीय गृह मंत्रालयाने बीएसएफच्या अधिकारक्षेत्रात बदल केला आहे. हा बदल बीएसएफ कायदा 1968 चे कलम 139 (1) अंतर्गत करण्यात आलेल्या तरतुदींच्या आधारावर केला आहे. याचा प्रभाव 12 राज्ये गुजरात, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय तर केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाखवर पडणार आहे.  यातील आसाम, पश्चिम बंगाल आणि पंजाब या राज्यांमध्ये बीएसएफचे अधिकारक्षेत्र पूर्वीच्या तुलनेत अत्यंत मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. या राज्यांमध्ये पूर्वी बीएसएफ सीमेपासून 15 किलोमीटर आतपर्यंत कारवाई करू शकत होते. सुरक्षा दल आता 50 किलोमीटरच्या कक्षेपर्यंत मॅजिस्ट्रेटचा आदेश आणि वॉरंटशिवाय कारवाई करू शकणार आहे.

गुजरातमध्ये कार्यकक्षा घटली

ईशान्येतील 5 राज्ये मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमध्ये बीएसएफला राज्यात कारवाईचा अधिकार राहणार आहे. अशाचप्रकारे जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्येही बीएसएफ कुठेही कारवाई करू शकते. गुजरातमध्ये बीएसएफचे अधिकारक्षेत्र कमी करण्यात आले आहे. तेथे पूर्वी सीमेपासून 80 किलोमीटरपर्यंतच्या कक्षेत कारवाई करता येत होती. तर आता ही व्याप्ती 50 किलोमीटरपर्यंत झाली आहे. तर राजस्थानात या पूर्वीप्रमाणेच बीएसएफचे अधिकारक्षेत्र 50 किलोमीटरपर्यंत राहणार आहे.

Related Stories

पंजाबमध्ये दिवसभरात 2,319 नवीन बाधित; 58 मृत्यू 

Rohan_P

जीएसटी संकलन सप्टेंबरमध्ये सर्वाधिक

Patil_p

”माझी सर्वांना विनंती आहे की, आमचा त्रास वाढवू नका ” – हॉकीपटू वंदना कटारिया

Abhijeet Shinde

पुदुच्चेरीचे काँग्रेस सरकार पराभूत

Patil_p

वीज ग्राहकांचे सशक्तीकरण

Patil_p

सिंधू बॉर्डरवरील हत्याकांडाने देशभरात खळबळ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!