तरुण भारत

बारा मतदान केंद्रांचे प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे

जिल्हा निवडणूक विभागाने पाठविला मंजुरीसाठी प्रस्ताव, विधान परिषद निवडणूक

प्रवीण देसाई/कोल्हापूर

Advertisements

कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी प्रशासकिय पातळीवर जोरदार तयारी सुरु आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे बारा केंद्रे निश्चित केली जाणार आहेत. या नियोजित केंद्रांचे प्रस्ताव जिल्हा निवडणूक विभागाने सोमवारी (दि.15) भारत निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविले.

विधान परिषदेसाठी 10 डिसेंबरला मतदान व 14 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून युध्दपातळीवर तयारी सुरु आहे. या निवडणुकीसाठी संपूर्ण जिल्हा कार्यक्षेत्र आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरपरिषद व नगरपंचायतींचे नगरसेवक हे मतदार आहेत. या निवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्यात मतदान केंद्रे करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी तालुक्यातील ठिकाणेही निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार या नियोजित केंद्रांचा प्रस्ताव सोमवारी (दि.15) जिल्हा निवडणूक विभागाने तयार केला. त्यानंतर तो कर्मचार्यांच्या मार्फत भारत निवडणूक आयोगाच्या मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यात आला.

प्रस्तावित केंद्रे अशी

तालुका प्रस्तावित मतदान केंद्रे
चंदगड तहसिलदार कक्ष, तहसिलदार कार्यालय
आजरा तहसिलदार कक्ष, तहसिलदार कार्यालय
गडहिंग्लज तहसिलदार कक्ष, तहसिलदार कार्यालय
राधानगरी तहसिलदार कक्ष, तहसिलदार कार्यालय
भुदरगड सार्वजनिक बांधकाम इमारत, उत्तर बाजू खोली, गारगोटी
कागल शाहु सुविधा केंद्र, तहसिलदार कार्यालय
करवीर डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम वाचनालय, जिल्हा परिषद इमारत
गगनबावडा तहसिलदार कक्ष, तहसिलदार कार्यालय
पन्हाळा नगरपरिषद हॉल
शाहुवाडी नगरपरिषद हॉल
हातकणंगले तहसिलदार कक्ष, तहसिलदार कार्यालय
शिरोळ तहसिलदार कक्ष, तहसिलदार कार्यालय

Related Stories

कोल्हापूर : अन्यथा मनपा इमारतीवरुन उड्या घेवू

Abhijeet Shinde

सीपीआर पुन्हा कोरोना आयसोलेटेड!

Abhijeet Shinde

कोल्हापूर : इचलकरंजीत तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा ; रोख रक्कमेसह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ट्रकच्या धडकेत गडमुडशिंगीतील वृद्धा ठार

Abhijeet Shinde

रोजंदारी कर्मचार्‍यांबाबत होणार निर्णय

Sumit Tambekar

कोडोलीतील चर्चचा शताब्दी महोत्सव, दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!