तरुण भारत

दिव्यांगांना घरातूनच करता येणार मतदान

प्रतिनिधी / कोल्हापूर

दिव्यांग मतदारांना घरुनच मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगातर्फे पोस्टल बॅलेट' (टपाली मतपत्रिका) ची सोय करण्यात आली आहे. याबरोबरच दिव्यांगांना मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठीपीडब्ल्यूडी ऍप’ ची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी येथे दिली.

Advertisements

उंचगाव (ता. करवीर) येथे प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत ‘विशेष ग्रामसभा’ आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच मालूताई काळे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, करवीर तहसिलदार शितल मुळे-भामरे आदी उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत मतदार यादीचे वाचन करण्यात आले. ग्रामसभेमध्ये मोठÎा संख्येने महिला सहभागी झाल्याबद्दल त्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी कौतुक केले. श्रीकांत देशपांडे म्हणाले, दिव्यांग मतदारांना घरुनच मतदान करता येण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने ‘पोस्टल बॅलेट’ (टपाली मतपत्रिका) ची सोय करण्यात आली आहे. याबरोबरच `पीडब्ल्यूडी ऍप’ मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घेतल्यास दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नोंदवता येते. त्यानंतर त्यांना त्या सुविधा निवडणूक आयोगातर्फे पुरवण्यात येतात.

श्रीकांत देशपांडे यांनी मतदारांसाठी `व्होटर्स हेल्पलाईन ऍप’ महत्वपूर्ण असल्याचे सांगून या ऍपबद्दल माहिती दिली. तसेच निवडणूक आयोगाची भूमिका, मतदार ओळखपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे आदी बाबींचीही सविस्तर माहिती त्यांनी दिली.

Related Stories

गोकुळ निवडणूक : ‘आता जागतिक कोर्टात जाऊ नये’

Abhijeet Shinde

गूळ सौदे बंद, बाजार समितीत तणाव

Abhijeet Shinde

‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ उपक्रम राबवणार

Abhijeet Shinde

ठाकरे सरकारची माझ्यावर हेरगिरी; खासदार संभाजीराजे यांचा गौप्यस्फोट

Abhijeet Shinde

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा आक्रोश, महावितरणचे मौन

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गांधीनगर बाजारपेठेत दुकान मालकासह पाच जणावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!