तरुण भारत

देशाच्या सरन्यायाधीशांनी टोचले वृत्तवाहिन्यांचे कान!

ऑनलाईन टीम/प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची समस्या अधिकाधिक तीव्र होऊ लागली आहे. दिल्ली सरकारने वाढत्या प्रदूषणामुळे आणि दृष्यमानता कमी झाल्यामुळे दिल्ली सरकारने २ दिवसांचा लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होम अशा पर्यायांचा विचार सुरू केला असताना दुसरीकडे पंजाब, हरयाणामधील शेतकरी तण जाळत असल्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलं आहे. यावरून दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये वाद सुरू झालेला असतानाच आता सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण यांनी प्रशासनासोबतच माध्यमांचे देखील कान टोचले आहेत.

पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी दरवर्षी या काळामध्ये शेतातलं अतिरिक्त ठरलेलं तण जाळून टाकतात. मात्र, याचं प्रमाण इतकं मोठं असतं की त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषित झाल्याचं दिसून येतं. याच कारणामुळे दिल्लीत देखील प्रदूषणाची पातळी अधिक गंभीर झाल्याचा दावा दिल्ली सरकारने केला आहे. यासंदर्भात थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना न्यायमूर्ती एन. व्ही. रामण यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.

यावेळी बोलताना सरन्यायाधीश एन. व्ही. रामण यांनी तोडगा काढण्यासाठी केंद्राला अधिक कार्यक्षमपणे शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा सल्लाही यावेळी दिला. तसेच प्रदूषणाचा विचार करता “केंद्र सरकारने शेतकऱ्यांना तण न जाळण्याविषयी समजावून सांगायला हवं. आम्हाला शेतकऱ्यांना शिक्षा द्यायची नाही. या शेतकऱ्यांनी किमान आठवडाभर तरी तण जाळू नये, यासाठी त्यांची समजूत घालण्याचे निर्देश आम्ही केंद्राला दिले आहेत”, असं न्यायमूर्ती रामण म्हणाले.

दरम्यान, यावेळी सरन्यायाधीश एन. व्ही. रामण यांनी वृत्तवाहिन्यांवर चालणाऱ्या चर्चांवर टिप्पणी केली. “टीव्हीवर चालणाऱ्या चर्चा या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रदूषण करतात. तिथे प्रत्येकजण आपापला अजेंडा राबवत आहे. पण इथे आम्ही समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत”, असं रामण यांनी नमूद केलं.

Advertisements

Related Stories

देशात 1.76 लाख उपचारार्थ रुग्ण

datta jadhav

बेंगळूरमध्ये काँग्रेस आमदाराच्या घरावर जमावाचा हल्ला; 2 ठार

datta jadhav

अमेरिकन सैन्याने देश सोडताच तालिबानचा जल्लोष

datta jadhav

भारतात एक लाखांहून अधिक कोरोनाबळी

datta jadhav

राहुल गांधी यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दापोलीतून याचिका

Abhijeet Shinde

“… त्या आधी भाजपशी जुळवून घ्यावं”, आमदार प्रताप सरनाईकांचं उद्धव ठाकरेंना पत्र!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!