तरुण भारत

कोल्हापूर : उद्योगमंत्री नारायण राणे यांची विविध समस्यावर उद्योजकांशी चर्चा

गोकुळ शिरगाव : कोल्हापूर

कणकवली येथे उद्योजकांच्या विविध समस्या बाबत कोल्हापूर मधील औद्योगिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न झाली. नारायण राणे यांना औद्योगिक संघटनांच्या वतीने विविध समस्या बाबत निवेदन देण्यात आले.

या बैठकीत केंद्र शासनाच्या MSME विभागाच्या विविध योजनांचा लाभ उद्योजकांना घेणेकरिता त्याची सविस्तर माहिती अवगत व्हावी, कोल्हापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये नवीन इंजिनिअरींगचे मोठे उद्योग येणेकरिता प्रयत्न व्हावेत जेणेकरून कोल्हापूर मधील उद्योजकांना नवीन काम करण्याची संधी उपलब्ध होईल व रोजगार निर्मिती होईल, कोरोंनाच्या महाभयंकर संकटामुळे उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सदर संकटातून बाहेर येण्यासाठी व उद्योग व्यवसायाच्या उन्नतीसाठी उद्योजकांना केंद्र व राज्य शासन स्तरावर विविध योजनांच्या अनुषंगाने सवलती देण्यात याव्यात, फौंड्री व इंजिनिअरींग उद्योगांना लागणार्‍या कच्च्या मालाचे दर कमी होणे करिता प्रयत्न करावेत इत्यादी विषय विविध संस्थेच्या माध्यमातून मांडण्यात आले.

वरिल विषयाबाबत नारायण राणे यांच्या समवेत सविस्तर चर्चा झाली. कोल्हापूर मधील असणार्‍या उद्योजकांना केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम (MSME) विभागाकडून कशाप्रकारे उद्योगवाढीसाठी मदत करता येईल याची माहिती देणे करिता व उद्योजकांच्या समस्या जाणून घेणे करिता नारायण राणे, यांना औद्योगिक संघटनांच्या वतीने कोल्हापूरला येणे बाबतचे निमंत्रण देण्यात आले. मंत्री नारायण राणे यांनी सदरचे मांडण्यात आलेले विषय सोडविण्यासाठी नक्कीच सहकार्य व प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.

या बैठकीस मा.निलेश राणे, मॅकचे अध्यक्ष संजय पेंडसे, माजी अध्यक्ष गोरख माळी, गोशिमा माजी अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, संचालक सुरजीत पवार, मॅक चे निमंत्रित सदस्य सुरेश क्षीरसागर, राजेंद्र कुलकर्णी व इतर मान्यवर उद्योजक उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर : त्रिसदस्यीय प्रभाग रचना शिवसेनेच्या पथ्यावर

Abhijeet Shinde

दसरा सोहळ्यास निमंत्रितांनाच प्रवेश

Abhijeet Shinde

राज्य नाट्यस्पर्धेला 1 जानेवारीपासून प्रारंभ

Sumit Tambekar

अवैध पर्ससीन, एलईडी मासेमारीसंदर्भात शासकीय अधिकाऱयावंर ताशेरे

Patil_p

प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरती प्रश्नांबाबत उद्या मंत्रालयात बैठक

Abhijeet Shinde

युरोप वारीसाठी हापूस सज्ज खाजगी विमानाचा होणार वापर

Patil_p
error: Content is protected !!