तरुण भारत

रेडमी नोट 11 टी 5 जी फोन 30 नोव्हेंबरला होणार लाँच

मुंबई

 शाओमी कंपनीचा नवा रेडमी नोट 11 टी हा 5 जी स्मार्टफोन येत्या 30 नोव्हेंबरला लाँच केला जाणार असल्याची माहिती आहे. सदरचा फोन हा नोट 10 टी 5 जीची सुधारीत आवृत्ती असणार असल्याचे समजते.

Advertisements

रेडमी नोट 11 मागच्या महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. नव्या डिझाइनसह येणारा हा स्मार्टफोन 11 सिरीजचा भारतातील पहिला असल्याचा दावा केला जातो आहे. याला कंपनीने ‘नेक्स्ट जन रेसर’ असे नाव दिले असून यात स्विफ्ट डिस्प्ले, फास्ट चार्जिंग आणि रॅम बुस्टर यासारखी वैशिष्टय़े असणार आहेत. रेडमी नोट 11 चाच नव्याने विकसित केलेला रेडमी नोट 11 टी असणार असल्याचे बोलले जात आहे.

वैशिष्टय़े पाहुया..

– 6.6 इंच एफएचडी डिस्प्ले पॅनेल

– 5000 एमएएच बॅटरी

– 33 वॉट फास्ट चार्जिंगची सुविधा

– सेंटर-अलाइन पंच होल कॅमेरा

– 50 एमपी रियर तर 16 एमपी प्रंट कॅमेरा

– स्टारडस्ट व्हाईट, मॅट ब्लॅक, ऍक्वामरीन ब्लू रंगात येणार

Related Stories

येणार दमदार बॅटरी असणारे स्मार्टफोन्स

Patil_p

फाईव्ह जी टॅबलेट

Omkar B

रियलमीचे दोन स्मार्टफोन्स सादर

Patil_p

थर्मोमीटरसह लाव्हाचा नवा मोबाइल बाजारात

Patil_p

एलजी विंग स्मार्टफोन 28 ऑक्टोबरला भारतात

Patil_p

गुगल पिक्सल एक्सएल लवकरच लाँच

Patil_p
error: Content is protected !!