तरुण भारत

पश्चिम बंगालमध्ये मूर्ती विटंबनेमुळे तणाव

कोलकाता / वृत्तसंस्था

पश्चिम बंगालच्या 2 परगाणा जिल्हय़ात काही स्थानांवर हिंदू देवदेवतांच्या मूर्तींची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या राज्याच्या तीन शहरांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. स्वरुपनगर येथे या घटनेच्या निषेधार्थ हिंदू समाजाने मोर्चाचे आयोजन केले होते. सारापूल येथेही मूर्ती विटंबनेची घटना घडली. हिंदूंचा ‘रास उत्सव’ हा पारंपरिक धार्मिक सण जवळ येत असून त्या सणासाठी या मूर्ती निर्माण करण्यात येत होत्या.

Advertisements

या मूर्तींची विटंबना झाल्याचे लक्षात येताच काही स्थानिक हिंदू नागरीकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन भग्न मूर्ती तेथून हलवून सुरक्षित स्थळी नेल्या. तसेच चौकशीला प्रारंभ केला. आतापर्यंत या विटंबना प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिस हेतुपुरस्सर या घटना दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न उच्चपदस्थ सत्ताधारी करीत आहेत, असा आरोप या भागांमध्ये कार्यरत असणाऱया हिंदू संघटनांनी केला असून गुन्हेगारांना त्वरित अटक करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांनी प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट केले.

Related Stories

दिल्लीतील भाजप मुख्यालयात 42 कर्मचारी पॉझिटिव्ह

datta jadhav

जम्मू काश्मीर : पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; एक जवान शहीद

Rohan_P

लसीसाठी काही आठवडय़ांचीच प्रतीक्षा

Patil_p

आयआरसीटीसीची नवी वेबसाईट, मिनिटाला 10 हजार तिकिटांचे बुकिंग शक्य

Rohan_P

रेल्वेचे जनरल डबेही होणार वातानुकुलित

Patil_p

इंधनाचे दर एप्रिलपासून घटणार?

Patil_p
error: Content is protected !!