तरुण भारत

पोलीस महासंचालकपदी इंद्रदेव शुक्ला

प्रतिनिधी /पणजी

गोव्याचे पोलीस महासंचालक मुकेशकुमार मिना यांची दिल्ली येथे बदली झाली असून नवे महासंचालक म्हणून इंद्रदेव शुक्ला यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या आठवडय़ात ते आपल्या पदाचा दाबा घेणार आहेत.

Advertisements

आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची 1995 साली निवड झाली होती व पहिली नियुक्ती म्हापसाचे पोलीस उपअधीक्षक म्हणून झाली होती. अधीक्षक म्हणून बढती मिळाल्यावर त्यांनी दिल्ली मिझोराम येथे सेवा केली. उपमहानिरीक्षक म्हणून त्यांनी अंदमान निकोबार येथेही काम पाहिले. महानिरीक्षक म्हणून त्यांनी दिल्ली येथे सेवा बजावल्यानंतर आता महासंचालक म्हणून त्यांना गोव्यात पाठवण्यात आले आहे.

Related Stories

न्यायालयातील कर्मचाऱयांविरुद्ध सरन्यायाधीशांकडे तक्रार

Omkar B

पेळावदा रस्ता दुरुस्तीनंतर वाहतुकीस खुला

Amit Kulkarni

मैदानावर इमारत उभारण्यास स्थानिकांचा विरोध

Omkar B

कुडचडे नगरपालिकेतील घडामोडींवर तीव्र संताप

Amit Kulkarni

मेरशी पंचायतीतही भाजप विरुद्ध भाजप

Amit Kulkarni

आयुष्मान सहकारासाठी सामंजस्य कराराचे अनावरण

Omkar B
error: Content is protected !!