तरुण भारत

वादळी पावसामुळे शेतकऱयांचे लाखोंचे नुकसान

प्रतिनिधी /बेळगाव

मंगळवारी सायंकाळी वादळी पावसाने सुमारे पाच तास संततधार पाऊस झाला. त्यामुळे मजगाव परिसरातील शेतवडीतील कापणी करून ठेवलेले संपूर्ण भात पाण्याखाली गेल्याने शेतकऱयांचे अतोनात नुकसान झाले आहे.

Advertisements

मोठय़ा अपेक्षेने रब्बी हंगामातील कडधान्य पेरणीही काही शेतकऱयांनी केली होती. अनेक शेतकऱयांनी बासमती, हंगाम गेल्याने इंद्रायणी व इतर भात पिके कापून ठेवली होती. मात्र अचानक आलेल्या वादळी पावसात शेतवडीतील भात पिकात पाणी साचले आहे. मसूर, हरभरा, गहू, वाटाणा ही रब्बी पिके पाणी साचून राहिल्याने कुजून जाणार असल्याने परिसरातील शेतकऱयांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

संबंधित अधिकाऱयांनी येथील विभागातील पिकांची पाहणी करून शासनामार्फत नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे.

Related Stories

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी कोरोना संदर्भात बोलावली तातडीची बैठक 

Abhijeet Shinde

जिल्हय़ातील 1235 जणांचे अहवाल निगेटिव्ह

Patil_p

मोजक्याच बसेस धावल्या ; प्रवाशांची संख्या नगण्य

Patil_p

पाणीपुरवठा खात्याचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळय़ात

Amit Kulkarni

रेल्वेमार्गाला शेतकऱयांचा का आहे विरोध?

Amit Kulkarni

उचगाव ग्रा. पं. च्या 21 जागांसाठी 83 उमेदवारी अर्ज

Patil_p
error: Content is protected !!