तरुण भारत

विधानपरिषद निवडणूक अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्याबाबत केल्या सूचना

जिल्हाधिकाऱयांनी घेतली अधिकाऱयांची बैठक

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

प्रत्येक निवडणूक ही महत्वाची असते. निवडणूक आयोगाने ज्या मार्गसूची जारी केल्या आहेत त्या मार्गसूचींचे पालन करत कोणत्याही प्रकारची हयगय करू नका. प्रत्येक काम सावधगिरीने करा, आवश्यकता भासल्यास वरिष्ट अधिकाऱयांशी चर्चा करा. मात्र विधान परिषद निवडणूक ही अत्यंत शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली पाहिजे. त्यासाठी अधिकाऱयांनी योग्य काळजी घ्यावी, अशी सूचना नूतन जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन अधिकाऱयांना त्यांनी या निवडणुकीबाबत सूचना केल्या आहेत. निवडणुकीसाठी नेमलेल्या सर्व पथकांनी पूरक काम करावे. कोणतीही तक्रार येऊ नये. तक्रार आल्यास तत्काळ त्यांची चौकशी करून वेळीच त्याचे निरसन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मतदान, मतमोजणी याबद्दल कोणीही हलगर्जीपणा करू नका. प्रशिक्षणादरम्यान कोणत्याही शंका असल्यास त्याचे निरसन करून घ्यावे, असेही ते म्हणाले.

कोविड मार्गसूचींचे पालन करा

प्रचारसभेदरम्यान कोविड मार्गसूचीचे सक्तीने पालन करावे. यासाठी अधिकाऱयांनी जनजागृती करावी. संबंधित उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना याबाबत सूचना कराव्यात, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. एकूणच निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत शांततेत आणि यशस्वीपणे पार पडली पाहिजे. यासाठी सर्व उपाय योजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

या निवडणुकीसाठी 48 व्हिडीओग्राफरची टीम तसेच 50 फ्लाईंग स्कॉड तयार करण्यात आली आहेत. त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल. निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱयांसाठी लवकरच प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आचारसंहितेसाठी नोडल अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या अधिकाऱयांनी आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत. तसेच आचारसंहिता भंग केलेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.

एकूण 511 मतदान केंदे उभारणार

निवडणूक आयोगाने ज्या प्रकारे ग्राम पंचायत, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी निवडणूक केंदे उभारली होती त्याच धर्तीवर जिह्यामध्ये होणाऱया दोन विधान परिषदेसाठी 511 मतदान केंदे स्थापन केली जाणार आहेत.

या बैठकीला पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर, शशिधर बगली, बुडा आयुक्त प्रितम नसलापुरे, निवडणूक प्रशिक्षक एन. व्ही. शिरांगकारा, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ आणि डॉ. बाळकृष्ण तुक्कार उपस्थित होते.

Related Stories

शाहूनगर येथील गटारीचे काम तातडीने पूर्ण करा

Amit Kulkarni

तपोभूमी माझ्या हातून होणे हे भाग्यच

Patil_p

तब्बल दीड तास महामार्ग रोखला

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुक येथे 95 रिंगणात, 7 बिनविरोध

Patil_p

…अन् अंगाला चिकटताहेत लोखंडी वस्तू

Amit Kulkarni

शेतकऱयांचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदन

Amit Kulkarni
error: Content is protected !!