तरुण भारत

चोरीप्रकरणी दोघांना अटक

दोन लाखाचे दागिने जप्त : शहापूर पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

चोरीप्रकरणी शहापूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. बुधवारी ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून 2 लाख रुपये किमतीचे 50 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूरचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर, उपनिरीक्षक मंजुनाथ, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. आय. सनदी, उदय पाटील, हवालदार ईश्वर बडीगेर, सुरेश कांबळे, एच. वाय. विभूती, महेश वडीयर, गंगव्वा इराप्पा पार्वती आदींनी ही कारवाई केली आहे.

शहापूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या एका चोरीप्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याजवळून 50 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून अटकेची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या कारवाईचे वरिष्ट अधिकाऱयांनी कौतुक केले आहे.

Related Stories

शिवाजी उद्यान येथे शस्त्रपुजन

Patil_p

सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी अजून दोन दिवस लागणार

Patil_p

मानस अकादमी डेव्हलपमेंट फौंडेशन चषकाचा मानकरी

Amit Kulkarni

कोनवाळ गल्ली रस्त्यावरील डांबर उखडले

Patil_p

हलगा-मच्छे बायपासबाबत पुन्हा शेतकऱयांवर दडपशाही

Patil_p

सिमेंट व्यावसायिकांचा एक दिवसाचा बंद यशस्वी

tarunbharat
error: Content is protected !!