तरुण भारत

भारताच्या ज्योती सुरेखा व्हेनामला सुवर्ण

ढाका :  येथे सुरू असलेल्या 2021 आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारताची महिला तिरंदाजपटू ज्योती सुरेखा व्हेनामने कोरियाच्या माजी विश्वविजेत्या युहेयुनचा पराभव करत महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात वैयक्तिक गटात सुवर्णपदक पटकाविले.

महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारातील अंतिम फेरीत भारताच्या ज्योती सुरेखा व्हेनामने कोरियाच्या युहेयुनचा 146-145 अशा गुणांनी निसटता पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत महिलांच्या मिश्र सांघिक कंपाऊंड प्रकारात भारताच्या ऋषभ यादव आणि ज्योती सुरेखा व्हेनाम यांनी रौप्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात कोरियाच्या युनही आणि याँगची यांनी भारताच्या यादव आणि व्हेनाम यांचा 155-154 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन पदकाची कमाई केली आहे.

Advertisements

Related Stories

तिरंदाजीत राकेशकुमारला सुवर्णपदक

Patil_p

आयपीएलमधील युवा यष्टीरक्षकांसाठी धोनी प्रेरणास्थान

Patil_p

थिएम उपांत्यपूर्व फेरीत, नदाल शेवटच्या 16 खेळाडूंत

Amit Kulkarni

मुंबई इंडियन्सचा 48 धावांनी धमाकेदार विजय

Patil_p

5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर साकारले टिटमसचे स्वप्न!

Patil_p

किवीज व्हॉईटवॉशसाठी भारत सज्ज

Patil_p
error: Content is protected !!