तरुण भारत

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश; कृषी कायदे अखेर रद्द

नवी दिल्ली/प्रतिनिधी

केंद्राने लागू केलेले कृषी कायदे अखेर रद्द केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधांनी घरी परतण्याचे आवाहन केले. हे तीन कायदे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केले होते. देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकर्‍यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता. या शेतकऱ्यांनाही सर्वांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमांतून चर्चा सुरू राहिली. शेतकऱ्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

Advertisements

Related Stories

जम्मू : कोरोनामुळे यंदाही अमरनाथ यात्रा रद्द

Rohan_P

टिकैत-ममता बॅनर्जी यांच्यात शेतकऱयांच्या प्रश्नांवर चर्चा

Patil_p

आसाममध्ये 1616 उग्रवाद्यांचे आत्मसमर्पण

Patil_p

ईपीएफओ वेतनपट: ऑक्टोबर 2020 मध्ये 11.55 लाख वर्गणीदार जोडले

Rohan_P

नदीत बुडालेल्यांचा शोध घेणारे उपकरण

Patil_p

भविष्यात ‘एआय’ शिक्षक देणार गुण

Patil_p
error: Content is protected !!