तरुण भारत

…तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार : टिकैत

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वादग्रस्त ठरलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यांच्या निर्णयाचे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आम्ही स्वागत करतो. मात्र, संसदेत हे कायदे रद्द होण्याची वाट पाहिली जाईल, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन केवळ तीन काळे कायदे रद्द करण्याच्या विरोधात नाही तर शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठीही आहे. शेतकऱ्यांची ही महत्त्वाची मागणी अजून बाकी आहे. लवकरच यासंदर्भात बैठक होईल आणि आंदोलन मागे घेण्यासंदर्भात निर्णय जाहीर केला जाईल, असे संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी तीन कृषी कायदा विधेयके मागे घेण्याची घोषणा केली. परंतु एमएसपी आणि वीज दुरुस्तीबाबत समिती स्थापन करण्यासह अन्य मुद्यांवर अद्याप चर्चा झालेली नाही.
सध्या संयुक्त आघाडी लवकरच पुढील रणनीती आखणार आहे. हे आंदोलन तातडीने मागे घेतले जाणार नाही, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.

Related Stories

कल्याण सिंग यांची प्रकृती बिघडली

Patil_p

जगभरात 1.41 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

न्यूयॉर्क : टाईम स्क्वेअरमध्ये भारतीय नागरिकांकडून चीनविरोधात निदर्शने

datta jadhav

ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण असणारं महाराष्ट्र लवकरच देशातील पहिलं राज्य असेल: मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

छत्तीसगड : आठ टक्क्यांपेक्षा कमी संसर्ग दर असणाऱ्या जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये सूट

Rohan_P

मधूमेह, रक्तदाब, 81 वर्षे वय तरीही कोरोनावर मात

Patil_p
error: Content is protected !!