तरुण भारत

‘लावा’चा पहिलावहिला 5 जी मोबाईल दाखल

अग्नी नामक फोन दाखल – 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा- किंमत 20 हजाराच्या आत

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

मोबाईलच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱया लावा इंटरनॅशनल या मोबाईल निर्मिती कंपनीने आपला पहिलावहिला 5 जी स्मार्टफोन भारतीयांसाठी नुकताच सादर केला आहे. ‘अग्नी’ या नावाने लावा कंपनीने भारतामध्ये आपला नवा स्मार्टफोन सादर केला आहे.

सदरच्या स्मार्टफोनची निर्मिती उत्तर प्रदेशमधील नोएडा या ठिकाणी असणाऱया कंपनीच्या कारखान्यामध्ये करण्यात आली आहे. भारतीय कंपनीने सादर केलेला हा पहिलावहिला 5 जी स्मार्टफोन असल्याचे लावा इंटरनॅशनलने म्हटले आहे. तांत्रिकदृष्टय़ा अद्ययावत असणारा हा 5 जी स्मार्टफोन असणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख सुनील रैना यांनी म्हटले आहे. मीडिया टेक डायमेनसिटी 810 चिपसेट या फोनला असणार आहे. सदरच्या फोनची किंमत ही 20 हजार रुपयापर्यंत असणार असल्याची माहिती आहे. अग्नी 5 जी फोन 6.78 इंच फुल्ल हाय-डेफिनेशन प्लस आयपीएस पंच होल डिस्प्लेसह येणार असून इतर सर्व चिनी ब्रँडना मागे टाकण्यामध्ये कंपनीने यश मिळवले आहे. सदरच्या फोनच्या स्क्रीनला कॉर्निंग गोरीला ग्लासचे प्रोटेक्शन आहे. 8 जीबी रॅम, 128 जीबी अंतर्गत साठवणुकीची सोय यामध्ये असणार आहे. 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा या फोनला असणार असून 16 एमपीचा प्रंट कॅमेराही आहे. बॅटरी 5000 एमएएच क्षमतेची आहे. त्याचप्रमाणे सुपर फास्ट चार्जिंगची सोयही यात असेल. स्मार्टफोन रिटेल शोरूमसह ऍमेझॉन, फ्लिपकार्टमधून खरेदी करता येईल.

स्मार्टफोनची वैशिष्टय़े….

– 6.78 इंच फुल्ल हाय-डेफिनेशन प्लस आयपीएस पंच होल डिस्प्ले

– मीडिया टेक डायमेनसिटी 810 चिपसेट

– 5000 एमएएच बॅटरी

– 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 16 एमपीचा प्रंट कॅमेरा

– 8 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज

Related Stories

शाओमी ब्रँडच्या स्मार्टफोन्सना सर्वाधिक पसंती

Patil_p

वन प्लस नॉर्डचा नवीन विक्रम

Patil_p

रियलमीने विकले 5 कोटी स्मार्टफोन्स

Patil_p

येत्या 5 वर्षात मोबाईल कंपन्या ‘5 जी’ सेवेसाठी खर्च करणार

Patil_p

सोनी प्ले स्टेशन 5 चा कार्यक्रम लांबणीवर

Patil_p

सॅमसंगचा ‘एम-42’ 5-जी स्मार्टफोन बाजारात दाखल

Patil_p
error: Content is protected !!