तरुण भारत

डास नियंत्रणासाठी ड्रोनचा आधार

दिल्लीत सध्या कोरोनापेक्षा अधिक चिंता डेंग्युची आहे. डेंग्यू रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ होत आहे. हा रोग डासांमार्फत पसरत असल्याने डास नियंत्रणासाठी आता दिल्ली प्रशासनाने ड्रोनचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी जाऊ शकत नाहीत. तसेच मानवी हाताने लारवा विरोधी द्रावणाची फवारणी होऊ शकत नाही, तेथे ड्रोनच्या साहाय्याने ही फवारणी करून डासांची उत्पत्ती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयोग करण्यात येणार आहेत.

माणूस पोहोचू शकत नाही, अशा दुर्गम ठिकाणी डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवणे अशक्य असल्याने तेथेच मोठय़ा प्रमाणात डासांची निर्मिती होते आणि ते शहरभर पसरतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे दिल्लीच्या तिन्ही महानगरपालिकांनी ड्रोनचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. तो यशस्वी झाल्यास डासांमुळे उत्पन्न होणाऱया मलेरिया किंवा डेंग्यूसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्याचा एक सोपा मार्ग उपलब्ध होईल, अशी आशा आहे.

Advertisements

Related Stories

पत्रकार परिषदेला सामोरे न जाणारे पंतप्रधान मोदी जगातील एकमेव नेते – पी. चिदंबरम

Abhijeet Shinde

‘मोरेटोरियम’ची मुदत वाढणार?

Patil_p

ख्रिसमस, नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर दिल्लीत बंदी

Patil_p

खासगी रुग्णालयात २५० रुपयात मिळणार लस

Abhijeet Shinde

ख्राइस्टचर्च हल्ला : गुन्हेगाराला जन्मठेप

Patil_p

नवज्योत कौर यांचे ‘कॅप्टन’ना आव्हान

Patil_p
error: Content is protected !!