तरुण भारत

एसटी कर्मचारी संप सुरुच

नोटीसा धाडल्याने सागर पळसुले यांच्या विरोधात नाराजीचा सुर

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

सातारा विभागातील सर्वच एसटी आगारातील कर्मचाऱयांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कोणत्याही कर्मचाऱयास नोटीस काढायची नाही, अशी सक्त ताकिद लोकप्रतिनिधींनी देवूनही विभागीय नियंत्रक सागर पळसुले यांनी रोजंदारीवर काम काम करणाऱया 188 कर्मचाऱयांना नोटीस बजवल्याने नाराजी व्यक्त होत असून त्या नोटीसीला कामगारांनी बेदखल करत कामावर गेले नसून आपला संप शुक्रवारी सुरुच ठेवला होता. दरम्यान, सातारा आगारात अभ्या असलेल्या बसेस युवक युवतींचे अश्लिल चाळे करण्याचे केंद्र बनले आहे. 

राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळ विलिगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी  दि. 8 पासून सातारा जिह्यातील सर्व आगारांतील कर्मचाऱयांनी संप पुकारला आहे. हा संप मोडित काढण्यासाठी एसटीच्या अधिकाऱयांवर शासनाचा दबाव आहे. त्यामुळेच अगोदरच एसटी कर्मचाऱयांना तुच्छ समजणारे सातारचे विभागीय नियंत्रक सागर पळसुले यांनी दोन दिवसांपूर्वी जिह्यातील 188 कर्मचाऱयांना 24 तासात कामावर हजर राहण्याची नोटीस बजावली होती. हे कर्मचारी रोजंदारीवरचे असून त्यांनी या नोटीसीनुसार शुक्रवारी हजर झालेले नव्हते. परंतु सातारा जिह्यातील बहुतांशी सर्वच लोकप्रतिनिधींनी विभागीय नियंत्रक सागर पळसुले यांना विनंतीवजा कोणत्याही कर्मचाऱयांवर कारवाई करु नका, असे सांगितले होते. तरीही सागर पळसुले नोटीस काढल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच सातारा आगारात संप असल्याने उभ्या असलेल्या बसेसमध्ये युवक युवती या बसून अश्लिल चाळे करत आहेत. त्यावर बसस्थानक चौकीचे पोलीस कर्मचारी जरी गस्त टाकत असले तरीही टुकार युवकयुवती या बसेसमध्ये आढळून येत आहेत.

सागर पळसुले यांच्या विरोधात संताप

सातारा विभागीय नियंत्रक सागर पळसुले हे एसटी कर्मचाऱयांच्या विरोधत वर्तन करत असल्याने सर्वच संघटनांमधून त्यांच्याबाबत नाराजीचा सुर आहे. त्यातच या आंदोलनामध्ये एसटी कर्मचाऱयांना त्यांनी नोटीसा बजावल्याने त्यांच्या विरोधात आंदोलना होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Related Stories

आगामी चित्रपटात सुबोध भावे पहिल्यांदाच साकारणार हटके भूमिका

Sumit Tambekar

योगसम्राज्ञी… उमा चौगुले

datta jadhav

जिल्ह्यात तीन ठिकाणी मटका, जुगार अड्डयांवर छापे

datta jadhav

सातारा : ग्रेड सेपरटेरवरील छ. संभाजी महाराजांचा नामफलक बॅनर फाडल्याने तणाव

Abhijeet Shinde

सातारा शहरात पाण्याचा ठणाणा

Abhijeet Shinde

अभियंता नांगरे यांना 9 महिन्यांचे मानधन परत करण्याचे आदेश

Amit Kulkarni
error: Content is protected !!