तरुण भारत

लोकमान्य संस्थेच्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद

प्रतिनिधी /वास्को

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या वेर्णा शाखेतर्फे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी वेर्णा येथील मरिना इंग्लिश हायस्कूलमध्ये पार पडला. या स्पर्धेत एकूण 195 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

Advertisements

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे ः गट अ (इयत्ता पहिली ते चौथी) – प्रथम – जिन्ने व्ही. ब्रागांझा (इयत्ता चौथी), द्वितीय – अबिगोईल ब्रागांझा (इयत्ता चौथी), तृतीय – बिखाम फर्नांडिस (इयत्ता तिसरी). गट ब (इयत्ता पाचवी ते सातवी) – प्रथम – अद्विता आब्रांचीस (इयत्ता सातवी), द्वितीय – सकिना मिरिजी (इयत्ता पाचवी), तृतीय – ऋतुराज व्ही. मेटकर (इयत्ता सहावी). उत्तेजनार्थ बक्षिसे – देविका एल. राजपूत (इयत्ता सातवी), स्वप्निल एन. महाले (इयत्ता सहावी) व अविना डा कॉस्ता (इयत्ता पाचवी).

बक्षीस वितरण समारंभाला लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक सुहास खांडेपारकर, क्लस्टर हेड साविओ डिमेलो, मडगाव विभागाचे समन्वयक ई मान्युएल फुर्तादो, वेर्णा शाखेचे व्यवस्थापक विल्सन एस. फालेरो, मार्केटींग व्यवस्थापक अक्षय सिनारी, वेर्णा येथील मरीना इंग्लिश हायस्कूलच्या प्राचार्य सिस्टर ट्रेसी, प्राचार्य फ्लोरा वालदारीस तसेच लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या वेर्णा शाखेचे कर्मचारी, मरीना इंग्लिश हायस्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुहास खांडेपारकर, क्लस्टर हेड साविओ डिमेलो, ई मान्युएल फुर्तादो व व्यासपीठावरील मान्यवरांच्याहस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

प्राचार्य फ्लोरा वालदारीस यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. शाखा व्यवस्थापक विल्सन फालेरो यांनी बक्षिसप्राप्त विद्यार्थ्यांची नावे घोषित केली. सिस्टर ट्रेसी यांनी आभार मानले.

Related Stories

डय़ुरँड स्पर्धेत मोहम्मेडन उपान्त्यपूर्व फेरीत

Patil_p

पोलीस प्रशासनात म्हापसा, फोंडा नवे जिल्हे

Omkar B

साखळी परिसरातील मतीमंद मुलांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कीटचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण..!

Patil_p

राणे जोडीची हुकुमशाही संपविणे काळाची गरज

Omkar B

भाजपने रामायणातून जबाबदारी, त्यागाची शिकवण घ्यावी

Amit Kulkarni

1961 चा रेकॉर्ड मोडण्यास मान्सून सज्ज

Patil_p
error: Content is protected !!