तरुण भारत

चहाविक्रीच्या कमाईतून 26 देशांची सैर

कोचीमध्ये एका चहाच्या दुकानातून प्राप्त कमाईतून जगातील 26 देशांची सैर करणाऱया दांपत्यातील एका सदस्याचे निधन झाले आहे. के.आर. विजयन यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. हे दांपत्य मागील महिन्यातच रशियातून परतले होते.

के.आर. विजयन आणि त्यांच्या पत्नी मोहना यांनी कोचीच्या गांधीनगरमध्ये एका चहाच्या दुकानातून प्राप्त उत्पन्नावर जगाची सैर केली. ‘श्री बालाजी कॉफी हाउस’ नावाच्या स्वतःच्या दुदानाद्वारे जगाचा प्रवास करण्यासाठी विजयन आणि मोहना यांनी दैनंदिन उत्पन्नातून 300 रुपये वाचविले. प्रसंगी पैसे कमी पडल्यावर त्यांनी बँकांकडून कर्ज घेत विदेशी प्रवास केला आहे.

Advertisements

दांपत्याने मागील 16 वर्षांमध्ये 26 देशांचा दौरा केला. त्यांच्याकडून प्रेरणा घेत केरळमधील अनेकांनी जगभर प्रवास केला आहे. विजयन यांना विविध व्यासपीठांवर स्वतःच्या प्रवासातील अनुभव मांडण्याची संधी मिळाली. सप्टेंबर महिन्यात दांपत्याने रशियाला जाण्यापूर्वी राज्याचे पर्यटनमंत्री पी.ए. मोहम्मद रियाज यांची भेट घेतली होती. विजयन यांनी स्वतःच्या वडिलांसोबत देशातील विविध भागांचा प्रवास केला होता. 1988 मध्ये त्यांनी हिमालय आणि त्यानंतर सर्व राज्यांचा दौरा केला होता. डिसेंबर 2007 मध्ये त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवास इजिप्तसह सुरू झाला. या दांपत्याने अमेरिका, जर्मनी, स्वीत्झर्लंड, ब्राझील, अर्जेंटीना आणि पेरूसह 26 देशांना भेट दिली आहे.

Related Stories

पंक्चर काढून कुटुंब चालवणारी ‘बेटी’

Patil_p

‘मोबाईल ऑपरेटर्स’च्या मानगुटीवर ‘एजीआर’चं भूत!

tarunbharat

वास्तुशास्त्र आणि खिडकी, दरवाजे

tarunbharat

शहराच्या तुलनेत गावातील मधमाशी अधिक मेहनती

Amit Kulkarni

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा संगीत महोत्सव रद्द

tarunbharat

‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे मुख्य मंदिरामध्ये गणेश कुंडामध्ये विसर्जन

Rohan_P
error: Content is protected !!