तरुण भारत

कचरामुक्त शहर म्हणून सातारा पालिकेचा दिल्लीत सन्मान

प्रतिनिधी/ सातारा

सातारा पालिकेने शहरात कचरा उचलण्याचे केलेले नियोजन, शहर स्वच्छतेचे केलेले काम यावरुन केंद्र स्तरावरुन कचरामुक्त शहर या पुरस्काराने दिल्ली येथे दि. 20 रोजी सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचा स्वीकार पेंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्यहा हस्ते सातारा पालिकेचे उपाध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी स्वीकारला. स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 चा राज्यात चौथ्या स्थानावर तर देशात 15 व्या स्थानावर सातारा शहराने सन्मान पटकावला. या पुरस्कारामुळे सातारा शहरासाठी स्वच्छतेच्या बाबतीत काम करण्यासाठी आणखी प्रेरणा मिळाली आहे.

Advertisements

सातारा शहराचा प्रत्येक वॉर्ड हा स्वच्छ वॉर्ड कसा राहिल. घराघरात तयार होणारा कचरा हा ओला आणि सुका वेगवेगळा गोळा करुन तो सोनगाव कचरा डेपोत नेवून त्यावर प्रक्रिया केली जाते. शहरातून दररोज सात टन कचरा गोळा करुन सोनगाव कचरा डेपोत त्याची विल्हेवाट लावली जाते. नव्याने हद्दवाढ झालेल्या भागातही स्वच्छता कशी राहिली यासाठी कटाक्षाने स्वतः उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी लक्ष घातले. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सातारा शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी वेळोवेळी सुचना दिल्या. आरोग्य विभागामध्ये योग्य ते बदल केले. त्यामुळे शहर कचरा मुक्त म्हणून केंद्र शासनाने सातारा शहरास घोषित करण्यात आले. त्यानुसार दिल्ली येथे विज्ञान भवनात सातारा शहराचा कचरामुक्त शहर म्हणून गौरव करण्यात आला. या पुरस्काराचा स्वीकार उपनगराध्यक्ष मनोज शेंडे आणि मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केला आहे.

सातारा शहराचा स्वच्छ सर्व्हेक्षण 2021मध्ये राज्यात 4 चौथा तर देशात 15 वा क्रमांक लागला असून 2011 च्या जनगणनेनुसार 1 लाख 20 हजार 195 लोकसंख्या आहे. जीएफसी स्टार रेटींगमध्ये थ्री स्टार ठरले आहे. ओडीएफ प्लस प्लस शहर ठरले असून देशात 372 शहरामध्ये सातारा शहर हे 15 व्या क्रमांकावर तर राज्यात 13 शहरामध्ये दुसऱया क्रमांकावर आहे. झालेल्या सर्व्हेमध्ये सातारा शहराला 6 हजार गुणांपैकी 3178 गुण नागरिकांच्या प्रतिक्रियेवर मिळाली.

सर्व सातारकरांचे श्रेय आहे

सातारा विकास आघाडीचे नेते खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शन सुचनेनुसार सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून शहर स्वच्छ आणि कचरा मुक्त कसे ठेवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न केला. शहरातील जेथे जेथे कचरा दिसेल त्या प्रभागातील घंटागाडी चालक असेल किंवा त्या भागातील मुकादमास दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे शहरात असा काही कचरा राहत नाही. विशेषतः हद्दवाढ झालेल्या भागात कचरा उचलण्यासाठी आरोग्य विभागाची पथके नेमली आहेत. हा मिळालेला सन्मान खऱया अर्थाने सर्व सातारकरांचे श्रेय आहे.

Related Stories

“…तर गद्दारांना दोन लाथा घाला”, सुनील केदारांचं वादग्रस्त वक्तव्य

Abhijeet Shinde

उरमोडी नदीपात्रात आढळला बेपत्ता महिलेचा मृतदेह

Abhijeet Shinde

खासदार संजय मंडलिक यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

Abhijeet Shinde

क्लिष्ट स्वरुपातील खुनाचा गुन्हा लोणंद पोलिसांकडून उघडकीस; आरोपी अटकेत

datta jadhav

महाराष्ट्रात 4,153 नवे कोरोना रुग्ण; 30 मृत्यू

Rohan_P

प्रवाशी वाहनांचे पार्किंग झाले बंद

Patil_p
error: Content is protected !!