तरुण भारत

दुचाकी अपघातात एक ठार, चारजण जखमी

वार्ताहर/ खडकलाट

खडकलाट-चिखलव्हाळ मार्गावर दुचाकीने ऊसतोड मजुराला जोराची धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. तर एक जण जखमी झाला. सालीराम नातू बिलाल (वय 45, रा. डामखेड, ता. चंगापूर, मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे. तर भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने डंपरला जोराची धडक दिल्याने यामध्ये दुचाकीवरील तिघेजण जखमी झाल्याची घटना साततोंडी लक्ष्मीक्रॉसनजीक घडली.

Advertisements

सदर घटनांविषयी अधिक माहिती अशी, येथील नाईकमळा येथे ऊसतोड सुरू आहे. तेथे सालीराम बिलाल व दत्तात्रय इंगवले (रा. पिंपळनेर, जि. बीड) हे दोघे 19 रोजी सायंकाळी 7 वाजता खडकलाट-चिखलव्हाळ मार्गावरून चालत नाईक मळय़ाच्या दिशेने जात होते.

यावेळी लक्ष्मण गिऱयाप्पा गावडे (रा. खडकलाट) हे दुचाकी (केए/23/ईपी/5059) वरुन भरधाव वेगात जात होते. त्यावेळी त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पायी जात असलेल्या सालीराम बिलाल व दत्तात्रय इंगवले यांना जोराची धडक दिली. यात सालीराम यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना बेळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात येत होते. पण, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तर सदर अपघातात दत्तात्रय यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर चिकोडी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी चिकोडी येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत सालीराम यांच्या पश्चात पत्नी व मुले असा परिवार आहे. सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दत्तात्रय यांनी खडकलाट पोलिसात तक्रार दाखल केली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मणाप्पा आरी करत आहेत?.

केवळ दैव बलत्तर म्हणून तिघे वाचले

भरधाव वेगाने दुचाकीवरून जाणाऱया दुचाकीची डंपरला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघेजण जखमी झाल्याची घटना साततोंडी लक्ष्मीक्रॉसनजीक घडली. केवळ दैव बलवत्तर असल्याने अपघात जीवितहानी झाली नाही. सदर अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महाविद्यालयीन विद्यार्थी असणारे तिघेजण दुचाकीवरून भरधाव वेगाने निपाणीहून चिकोडीच्या दिशेने जात होते. दरम्यान, साततोंडी लक्ष्मीक्रॉसनजीक येताच भरधाव दुचाकीने जैनापूर येथील महालक्ष्मी टेडर्सच्या डंपर (केए/23/बी/2400) ला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील तिघे विद्यार्थी सुदैवाने बाजूला फेकले गेल्याने जीवितहानी टळली. पण, दुचाकीचे मोठे नुकसान झाले. सदर घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत खडकलाट पोलीस स्थानकात दाखल झाली नव्हती. 

Related Stories

बसवेश्वर उड्डाणपुलाच्या एका बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण

Patil_p

मरगाई देवीची यात्रा साधेपणाने

Amit Kulkarni

शाळा सुरू करण्याचा नवा फॉर्म्युला

Patil_p

हिंडलग्यात चोरटय़ांचा धुमाकूळ

Patil_p

अहंकाराला मोडण्याची शक्ती जनतेत

Patil_p

‘ट्वेंटी-ट्वेंटी’ स्टाईल लढतीत भाजपची बाजी

Amit Kulkarni
error: Content is protected !!