तरुण भारत

कोल्हापूर : कापड व्यापाऱ्यावर हनी ट्रॅप, अल्पवयीन मुलीचा वापर,अडीच लाख रुपयांना गंडा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कापड व्यापाऱ्यास बलात्काराच्या गुह्यात अडकवण्याची धमकी देत त्याचे अपहरण करुन मारहाण करुन त्याच्याकडून अडीच लाख रुपये उकळणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषणने जेरबंद केले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्या व्यापाऱ्याशी जवळीक करण्यासाठी (हनी ट्रॅप) साठी अल्पवयीन मुलीचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलीस ताब्यात घेण्यात आले आहे तर 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

Advertisements

सागर पांडुरंग माने (वय 32 रा. कात्यायनी कॉम्प्लेक्स, कळंबा ता. करवीर), साहेल उर्फ अरबाज मुनाफ वाटंगी (वय 23 रा. जुना वाशी नाका), उमेश श्रीमंत साळुंखे (वय 23 रा. राजारामपुरी), आकाश मारुती माळी (वय 30 रा. यादवनगर मेनरोड), लुकमान शकील सोलापूरे (वय 27 रा. सरनाईक वसाहत, जवाहरनगर), सौरभ गणेश चांदणे (वय 23 रा. म्हाडा कॉलनी यादवनगर), विजय रामचंद्र गौड (वय 32 रा. कळंबा ता. करवीर) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने जेरबंद केले. त्यांच्याकडून जांबीया, मोबाईल हॅडसेट, मोपेड गाडी असा सुमारे 81 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंधरा दिवसांपूर्वी सोशल मिडीयावरुन शहरातील एका कापड व्यापाऱ्यासोबत एका अल्पवयीन मुलीसोबत ओळख केली. ओळखीचा फायदा घेवून त्या मुलीने व्यापाऱ्यासोबत लगट करुन मैत्री केली आणि त्या व्यापाऱ्यास भेटण्यास बोलवले. यानंतर त्या व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करुन व्यापाऱ्याच्या फ्लॅटवर भेटण्यासाठी गेली. यावेळी तिच्यासोबत तिचे काही सहकारीही गेले. त्या व्यापाऱ्यास तुला बलात्काराच्या गुह्यात अडकवतो अशी धमकी देत त्याला मोटारीत बसण्यास भाग पाडले. सात ते आठ जणांनी त्याला पन्हाळा रोडवर केर्ली गावाच्या नजीक निर्जन ठिकाणी नेवून मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात दगड मारण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्याच्या मोटारीत असणारे 1 लाख 50 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. तर त्याच्याकडील तीन कोऱ्या चेकवर सह्या करुन घेतल्या. तसेच त्याच्या अंगावरील दागिने बागल चौक येथील एका खाजगी फायनान्स कंपनीमध्ये ठेवून त्यावर 1 लाख रुपये घेतले. यानंतर वारंवार त्या व्यापाऱ्याकडे आणखी 10 लाख रुपयांची मागणी केली. यास कंटाळून त्या व्यापाऱ्याने शनिवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषणशी संपर्क साधून याबाबतची फिर्याद दिली. सराईत गुन्हेगार सागर माने याने साथिदारांसह हा गुन्हा केल्याची माहिती पोलीसांना मिळाली. यानुसार रविवारी सकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने संभाजीनगर एस. टी. स्टँड परिसरात सापळा रचला. आणि सागर माने, साहेल वाटंगी, उमेश साळुंखे, आकाश माळी, लुकमान सोलापूरे, सौरभ चांदणे यांना अटक केली. त्यांनी एका अल्पवयीन मुलगी आणि विजय गौड यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. यानुसार या दोघांनाही अटक करण्यात आली.

पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, किरण गावडे, कुमार पोतदार, रविंद्र कांबळे, प्रदिप पोवार, संजय पडवळ, पांडुरंग पाटील, अनिल पास्ते, सुप्रिया कात्रट यांनी ही कारवाई केली. हनी ट्रॅप किंवा अशा प्रकारे फसवणूक झालेल्या नागरीकांनी, व्यापाऱयांनी निर्भयपणे पुढे यावे. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन पोलीस अधिक्षक शैलेश बलवकडे यांनी केले आहे.

Related Stories

कलाकारांच्या मागण्या मंजूर करू : राज्यमंत्री यड्रावकर

Abhijeet Shinde

पेठवडगावात बारा कोरोना रुग्णांची भर, एकूण रुग्ण संख्या ६८

Abhijeet Shinde

इचलकरंजी मध्यवर्ती बस स्थानक नामकरणासाठी आ. आवाडेंचे ठिय्या आंदोलन

Abhijeet Shinde

राशिवडेत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Abhijeet Shinde

नृसिंहवाडीतील दारू विक्री बंदच्या ठोस कारवाईनंतर महिलांचे उपोषण मागे

Abhijeet Shinde

काळा दिवस पाळून केंद्र शासनाचा निषेध

Abhijeet Shinde
error: Content is protected !!