तरुण भारत

येमेनमध्ये हूती बंडखोर बॅकफूटवर

प्रमुख भागांवर शासकीय सुरक्षा दलांचा कब्जा

वृत्तसंस्था/ सना

Advertisements

लाल समुद्रात बंदर असलेले येमेनमधील होदेइदाह शहरात सध्या लढाई सुरू आहे. येमेन सरकारशी एकनिष्ठ असलेल्या सुरक्षा दलांनी हूती बंडखोर समुहाच्या प्रमुख क्षेत्रांवर कब्जा केला आहे. मागील काही तासांदरम्यान सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीकडून दक्षिण होदेइदाहच्या हेज जिल्हय़ात हूती बंडखोरांच्या विरोधात मोठी सैन्य मोहीम सुरू करण्यात आली आहे.

सैन्य मोहिमेमुळे हेजला पूर्णपणे सुरक्षित करण्यात आले आहे. तसेच हूती बंडखोरांना जिल्हय़ासोबत नजीकच्या क्षेत्रांमधून हाकलण्यात आले आहे. सरकार समर्थक सुरक्षा दल होदेइदाहमध्ये पुढे सरकत असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले आहे.

हेज जिल्ह्य़ाच्या विरोधात करण्यात आलेले दोन मोठे हल्ले हाणून पाडण्यास यशस्वी ठरल्याचा दावा हूती बंडखोर समुहाकडून करण्यात आला. मागील आठवडय़ात येमेनच्या सुरक्षा दलांनी होदेइदाहच्या दक्षिण आणि पूर्व क्षेत्रांमध्ये आंशिक स्वरुपात कब्जा केला होता.

सौदीच्या अनेक शहरांवर ड्रोन हल्ले केल्याचा दावा हूती बंडखोरांनी केला आहे. यात जेद्दा येथील किंग अब्दुल्लाह विमानतळ आणि अबहा विमानतळ यासारखी ठिकाणे सामील असल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यांकरता 14 ड्रोन्सचा वापर करण्यात आला होता.

Related Stories

मुलांच्या थोबाडीत मारणे धोकादायक!

Patil_p

बेपत्ता झालेल्या ‘त्या’ पाच तरुणांना चीन आज भारताच्या हवाली करणार

datta jadhav

इथियोपियात संघर्षात 200 हून अधिक जणांचा मृत्यु

Patil_p

हॉंगकॉंगकडून एअर इंडियाच्या विमानांवर पुन्हा बंदी

datta jadhav

श्वानासारख्या रोबोटमुळे अमेरिकेत खळबळ

Patil_p

…तर पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश होईल

datta jadhav
error: Content is protected !!