तरुण भारत

न्यायालयाच्या निर्णयाकडे संपकरी एसटी कर्मचाऱयांचे लक्ष

प्रतिनिधी/ रत्नागिरी

एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठीची 22 नोव्हेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आह़े न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्य तसेच जिह्यातील एसटी कर्मचाऱयांचे लक्ष लागून राहिले आह़े राज्य शासनाशी होणाऱया बैठकांमधून निराशा हाती लागलेले एसटी कर्मचारी न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत़ सलग 14 व्या दिवशी चालणाऱया एसटी कर्मचाऱयांच्या संपामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आह़े

Advertisements

  शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱयांनी संपाची भूमिका घेतल्याने राज्य शासनाकडूनही कठोर पाऊले उचलण्यात आली आहेत़ राज्यभरात चालणाऱया एसटी संपात सहभागी झालेल्या रत्नागिरी विभागातील 249 कर्मचाऱयांना सेवा समाप्तीची नोटीस बजावण्यात आली होत़ी 24 तासात कामावर हजर व्हा, असा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आला होत़ा आता नोटीसला उत्तर न देणाऱया 12 कर्मचाऱयांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आह़े

  आतापर्यंत संपात सहभागी झालेल्या 87 कर्मचाऱयांना सेवेतून निलंबित करण्यात आले आह़े तर 137 कर्मचारी कामावर हजर राहिले आहेत़ तसेच जिल्हय़ात केवळ राजापूर आगारातून 3 बस सोडण्यात आल्या होत्य़ा चिपळूण आगारातूनही चिपळूण रत्नागिरी अशी बस सोडण्यात आल़ी मात्र मोठय़ा प्रमाणावर चालक व वाहक कामावर हजर होत नसल्याने एसटी सेवा सुरू करण्यात अडचणी निर्माण होत आहेत़

  एसटी कर्मचाऱयांच्या संपामुळे विविध ठिकाणी प्रवासासाठी खासगी वाहतुकीचा आधार प्रवाशांकडून घेतला जात आह़े यामुळे वडाप तसेच खासगी वाहतूकदार प्रवाशांकडून पैसे उकळत असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत़ एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या 12 दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर अडून बसले आहेत़ सध्या तरी यामध्ये कोणताही तोडगा निघत नसल्याने प्रवासी मात्र हवालदिल झाले आहेत.

   आज कोंडी फुटणार?

जिह्यामध्ये एसटीच्या 4 हजार 500 फेऱयांना या संपाचा फटका बसला तर सुमारे 70 लाख रूपयांचे प्रतिदिन नुकसान होत आह़े आतापर्यंत सुमारे 10 कोटी रूपयांचा फटका रत्नागिरी विभागाला बसला आह़े एसटीच्या विलिनीकरणाचा विषय सध्या न्यायप्रविष्ठ असून 22 तारखेला पुढील सुनावणी होणार आह़े यामुळे सर्व एसटी कर्मचाऱयांचे लक्ष या 22 तारखेकडे लागले आह़े न्यायालयाच्या निर्णयानंतरच संपाची कोंडी फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े

Related Stories

सरमळे शितपवाडीत घरोघरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा

NIKHIL_N

दहा दिवसांच्या बाप्पाला आज निरोप!

Patil_p

रत्नागिरी : दापोली नजीक केळशी खाडी बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या दोनवर

Abhijeet Shinde

डॉ.आंबेडकरांना एकाच जातीत बांधता येत नाही!

NIKHIL_N

रत्नागिरी : लॉकडाऊनला विरोध, व्यापाऱ्यांचा बॅनर रातोरात हटवला

Abhijeet Shinde

मुंबईतील वीज बंदचा परिणाम रत्नागिरीतील बँकेवरही

Abhijeet Shinde
error: Content is protected !!