तरुण भारत

देशाच्या प्रगतीत भंडारी समाज योगदान देत राहील

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन, साळगाव मतदारसंघात मेळावा

वार्ताहर /कांदोळी

Advertisements

भंडारी समाजात कायमस्वरूपी संघटीत राहून भंडारी समाजाचा यापुढे एकजुटीने कार्य करीत रहावे देशाच्या प्रगतीत हा समाज योगदान देत राहील असे प्रतिपादन श्रीपाद नाईक यांनी आज झालेल्या भंडारी महिला समाजाच्या मेळाव्यात केंद्रीय राज्य पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले

साळगाव मतदार संघातील  साळगाव पंचायतीच्या सभाग्रहात आज झालेल्या भंडारी महिला समाजाच्या मेळाव्यात पुढे बोलताना ते म्हणाले की, भंडारी समाजाची आर्थिक स्थिती सुधारून भंडारी समाजाच्या महिलांनी आपली ताकद वाढवणे शाश्वत महिला होणे, अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही स्तरातील विजय मिळवण्यासाठी महिलांनी दुर्गेची उपासना करणे व ती शक्ती जागृत  करताना वंचित भंडारी समाजाचा झंझावत निर्माण करावा असे पुढे बोलताना म्हणाले.

अखिल गोवा भंडारी महिला समाजाच्या अध्यक्ष सौ. वायंगणकर म्हणाल्या की नंतर भंडारी समाजाच्या महिलांनी पुन्हा नव्याने ऊर्जा देण्याच्या दृष्टीने ओ बी सी चा विषय बांधवा पर्यंत व्यापकतेने पोहोचणे, इतर मागासवर्गीय समाजासाठी शासकीय पातळीवर असलेला सेवा विविधा व योजना बाबत जनजागृती करणे आर्थिक दृष्टय़ा कमजोर वर्गातील व्यक्तीसाठी सामूहिक खर्चाने विवाह घडवून आणणे अत्यंत गरजेचे आहे. असे त्या म्हणाल्या. माजी पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यावेळी आपले विचार व्यक्त करताना भंडारी समाजात सर्वानी कायमस्वरूपी संघटीत राहून भंडारी समाजाची आर्थिक दृष्टय़ा ताकद वाढवावी अशी अपेक्षा केली.

अखिल गोवा भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक आपल्या वक्तव्यात गोव्यातील विविध भागात बैठका घेऊन त्यानिमित्ताने समाजाला एकत्र करून प्रचार कार्य हाती घेण्यात येतील. यावेळी भंडारी समाजाचे उपाध्यक्ष देवानंद नाईक तसेच कला व संस्कृती खात्याचे माजी मंत्री दयानंद मांदेकर,भंडारी समाजाचे कार्यकरी सदस्य महानंद अस्नोडकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.

या मेळाव्यात गोमंतक भंडारी समाजाच्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी साळगाव मतदार संघातील सर्व सहाही पंचायत क्षेत्रातील भंडारी समाजाच्या महिलांनी मोठय़ा संख्येने या मेळाव्यास उपस्थिती दाखवली .

यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर कला व सांस्कृतिक खात्याचे माजी मंत्री दयानंद मांदेकर भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक उपाध्यक्ष देवानं नाईक प्रगती पेडणेकर सरिता बोरकर भंडारी समाजाचे कार्यकारी सदस्य महानंद अस्नोडकर अखिल गोवा भंडारी समाजाचे महिला अध्यक्ष शुभांगी वायंगणकर प्रदेशाध्यक्ष मेधा परुळेकर व सहाही पंचायत क्षेत्रातील भंडारी समाजाचे महिला अध्यक्ष उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन सौ मेदा परुळेकर यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार सुजाता नाईक यांनी मानले.

Related Stories

कोरोनामुळे एकाच दिवशी तिघांचा मृत्यू

Patil_p

मडगावात साईबाबा पुण्यतिथी साजरी

Amit Kulkarni

पणजीत सुमारे 1 लाखाचा गुटखा जप्त

Omkar B

सावर्डे येथे गव्यारेडय़ाला विहीरीतून सुखरूप जीवदान

Patil_p

आडपई गावात, उत्साहाला उधाण ..!

Amit Kulkarni

सत्तरीत काळी मीरी उत्पादनाला येणार चांगले दिवस

Patil_p
error: Content is protected !!