तरुण भारत

चित्रपटासाठी दर्जेदार आशय, भक्कम कथानक महत्त्वाचे

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे प्रतिपादन : इफ्फीमध्ये ’भारतीय पॅनोरमा’ विभागाचे उद्घाटन

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

आज चित्रपटाचा आशय सर्वात महत्वाचा आहे आणि तुमच्याकडे जर दर्जेदार आशय व भक्कम कथानक असेल तर तुमचे चित्रपट केवळ राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रेक्षकांपर्यंतही पोहोचतील, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केले.

52 व्या इफ्फीमध्ये रविवारी ‘भारतीय पॅनोरमा’ विभागाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचीही त्यावेळी उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री. ठाकूर यांनी, आपल्याकडे कौशल्य व प्रतिभा भरपूर आहे आणि सर्वांचे सहकार्य व सहभागाने आपण इफ्फीला नव्या उंचीवर नेऊया, असे ते म्हणाले. कथा मिळवण्यासाठी आपण सर्वांनी देशाच्या कानाकोपऱयातून, दुर्गम भागातून प्रयत्न आणि संघर्ष केला आहे. त्यासाठी सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत, असेही ठाकूर म्हणाले. इफ्फी गोव्याच्या भूमीत आणणारे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचेही त्यांनी यावेळी स्मरण केले.

पूर्वी एखाद्या चित्रपटासाठी केवळ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते यांनाच पुरस्कार दिले जायचे. मात्र आता तंत्रज्ञांसह चित्रपट निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱया पडद्यामागील कलाकारांचाही सन्मान करण्यात येतो. परदेशी चित्रपट निर्मात्यांनी भारतात यावे आणि इथे चित्रीकरण करावे, असे आवाहन देखील ठाकूर यांनी केले.

भारतीय चित्रपटातून दिसते समाजाचे प्रतिबिंब : आर्लेकर

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना श्री. आर्लेकर यांनी, आपण काही चित्रपट समीक्षक नाही वा चित्रपटांचा मोठा चाहताही नाही. मात्र, भारतीय पॅनोरमा विभाग नेहमीच बघतो. त्यातून आपल्या समाजाचे प्रतिबिंब दिसून येते, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. भारतीय चित्रपटातून, आपल्या समाजाचे प्रतिबिंब, गरजा, आकांक्षा आणि संघर्ष परिणामकारकपणे मांडलेले असतात, असे सांगितले.

‘सेमखोर’ सामाजिकदृष्टय़ा निषिद्ध विषयांवर भाष्य करणारा चित्रपट : बरुआ

भारतीय पॅनोरमामध्ये फीचर फिल्म विभागात प्रदर्शित होणारा ‘सेमखोर’ हा दिमासा भाषेतील पहिलाच चित्रपट आहे. ऐमी बरुआ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, या सन्मानाबद्दल त्यांनी इफ्फीचे आभार मानले. सामाजिकदृष्टय़ा निषिद्ध समजल्या जाणाऱया विषयांवर चर्चा करणारा ‘सेमखोर’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आसाममधील दिमासा समुदायाला करावा लागणारा संघर्ष जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, असे बरुआ यांनी सांगितले.

नॉन फीचर विभागातील उद्घाटनाचा चित्रपट ‘वेद-द व्हिजनरी’ चे दिग्दर्शक राजीव प्रकाश यांनी ही कथा, चित्रपट निर्मिती क्षेत्रात असलेल्या आपल्या वडिलांच्या चिकाटीची, धैर्याची कथा असल्याचे सांगितले. त्यांचे या क्षेत्रातील प्रयत्न, जे कायमच भारतीय चित्रपटांच्या इतिहासाचा भाग असतील, तेच या सिनेमात दाखवण्यात आले आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

‘सेमखोर’ आणि ‘वेद-द व्हीजनरी’ या दोन्ही चित्रपटांचे निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ यांचा श्री. आर्लेकर आणि श्री. ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महोत्सव सहभागाचे प्रमाणपत्रही देण्यात आले.

Related Stories

पारंपरिक नागपंचमी साजरी करण्यासाठी सत्तरी तालुका सज्ज

Omkar B

बुधवारी 136 कोरोनाबधित

Patil_p

दिल्लीत देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ

Amit Kulkarni

पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका

Amit Kulkarni

लोकांना आर्थिक मदतीची गरज नव्हे मोदीच्या पत्राची

Omkar B

दाडाचीवाडी धारगळ येथे उपमुख्यमंत्री बाबू आजगावाकर यांचा निषेध

Amit Kulkarni
error: Content is protected !!