तरुण भारत

विधानसभेनंतर पंचायत निवडणुकीचे पडघम

राज्य निवडणूक आयोगाकडून वार्ड पुनर्रचनेसाठी अधिसूचना जारी ; पंचायतीची मुदत जून 2022 मध्ये संपणार

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

फेब्रुवारी-मार्च 2022 मधील विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच (प्रामुख्याने मे) राज्यातील पंचायत निवडणुका होणार असून त्यासाठी वॉर्डाची पुनर्रचना करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्याकरीता आयोगाने तालुका मामलेदार, संयुक्त मामलेदार यांना मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नेमण्यात आले असून तशी अधिसूचना आयोगातर्फे जारी करण्यात आली आहे. वॉर्ड पुनर्रचनेचे काम मामलेदार संयुक्त मामलेदारांनी लवकरात लवकर करण्यासाठी त्यांना आयोगातर्फे आदेश देण्यात आले आहेत.

गोव्यातील पंचायतीची मुदत सर्वसाधारणपणे जून 2022 मध्ये संपत असून तत्पूर्वी म्हणजे मे 2022 मध्ये पंचायत निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे त्या निवडणुकांसाठी अंदाजे 6 महिन्यांचा कालावधी शिल्लक असून राज्यातील जनतेला नवीन 2022 या वर्षात विधानसभेबरोबरच पंचायत अशा एकूण दोन निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. या पंचायत निवडणुकीची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने आतापासूनच पूर्वतयारी सुरू केली आहे.

पंचायत वॉर्ड क्षेत्र, सीमा, एकूण मतदार व इतर तपशील गोळा करून त्याचा अहवाल सादर करण्याची सूचना आयोगाने केली आहे. वॉर्डची पुनर्रचना करण्याचे सर्व अधिकार सरकारने आयोगाला दिले असून ते काम आता आयोगाने हाती घेतले आहे. वॉर्डनिहाय नकाशाही सादर करण्याचे निर्देश आयोगाने मामलेदारांना दिले आहेत.

मागे पालिका निवडणुकीत वॉर्ड पुनर्रचनेवरून मोठा वाद निर्माण झाला होता आणि तो वाद न्यायालयातही पोहोचला होता. उच्च न्यायालय (गोवा खंडपीठ) आणि सर्वोच्च न्यायालयानेदेखील राज्य सरकारला या विषयी फटकारले होते. तेव्हापासून सरकारने वॉर्ड पुनर्रचनेतून अंग काढून घेतले असून ते काम आयोगाकडे सोपवले आहे.

Related Stories

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात

Amit Kulkarni

मडगाव पालिका क्षेत्रात पाच वर्षांत विविध विकासकामे मार्गी

Patil_p

मनपासह सात पालिकांसाठी 204 अर्ज

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांनी सनबर्नसारख्या ‘ईडीएम’वर बंदी घालावी

Patil_p

विद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर

Patil_p

मांगोरहिलमध्ये वाढते रुग्ण… वाढती अस्वस्थता !

Omkar B
error: Content is protected !!