तरुण भारत

अकाली दलासोबत आघाडीस भाजपचा नकार

कृषी कायद्यांच्या माघारीमुळे बदलली राजकीय समीकरणे

वृत्तसंस्था/ चंदीगड

Advertisements

भाजपच्या पंजाब शाखेने शिरोमणी अकाली दलासोबत आघाडी करण्याची शक्यता फेटाळली आहे. अकाली दलाऐवजी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासोबत हातमिळवणी करणे पसंत असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष अश्विनी शर्मा यांचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तिन्ही कृषी कायदे मागे घेतले जाणार असल्याची घोषणा करण्यात आल्याने राज्यातील राजकीय चित्र बदलले आहे.

मागील निवडणुकीत अकाली दलाने 84 टक्के जागांवर निवडणूक लढविली होती. भाजपने आघाडीत समर्थक म्हणून राहण्याचा मार्ग निवडला हाता. पण आम्ही पुन्हा त्या आघाडीत जाण्यास इच्छुक नाही. कृषी कायदे मागे घेण्यात आल्याने मोठय़ा नेत्यांना आता राज्यात प्रचारात सामील करता येईल. यापूर्वी पक्ष कार्यकर्त्यांना फिरणेही अवघड ठरले होते. मोठय़ा नेत्यांनाही नाराजीला तोंड द्यावे लागत होते असे त्यांनी म्हटले आहे.

अवघड काळ आणि विशेषकरून महामारीत भाजप कार्यकर्त्यांनी लोकांना मदत केली आहे. पक्षाचे कार्यकर्ते जिल्हा पातळीवर कार्यक्रम आयोजित करत आहेत. राज्यातील शहरी भागात कॅप्टन अमरिंदर यांचा मोठा प्रभाव आहे. तसेच त्यांनी भाजपसोबत आघाडी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कॅप्टन अमरिंदर यांनी पंतप्रधानांचे कौतुक करणारा एक लेख लिहिला असल्याचे अश्विनी शर्मा यांनी सांगितले आहे.

पुढील रणनीति भाजपचे नेतृत्व ठरणार आहे. जनतेपर्यंत योग्य कार्यक्रम पोहोचवून आणि काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा लाभ घेण्याच्या स्थितीत येण्याचा प्रयत्न भाजपचा राहणार असल्याचे शर्मा म्हणाले.

Related Stories

धोका वाढला : देशात कोरोना रुग्णांची संख्या 24 लाख पार

Rohan_P

अरूण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण

Abhijeet Shinde

राष्ट्रपती कोविंद गावी पोहोचताच भावूक ; माती कपाळावर लावत जन्मभूमीला केलं वंदन

Abhijeet Shinde

रुग्णवाढीचा वेग वाढला! 24 तासात 1.45 लाख बाधित

datta jadhav

पंतप्रधान मोदी आजही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नरेंद्रभाई; संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

Abhijeet Shinde

बँक बुडाली तरी 5 लाखांपर्यंत सुरक्षितता

Patil_p
error: Content is protected !!