तरुण भारत

समुद्रात तरंगणारे आलिशान घर

घरात उपलब्ध सर्व सुखसुविधा

समुद्रात तरंगणाऱया घरात राहण्याची स्वप्ने अनेकांनी बघितली असतील. शिकारा किंवा हाउसबोटवर याचा आनंदही घेतला असेल. अशाच शांत वातावरणात जीवन व्यतित व्हावे अशी इच्छाही मनात दाटून आली असेल. चीनच्या एका व्यक्तीच्या डोक्यात असाच विचार आला आणि त्याने स्वतःसाठी 600 चौरस फुटांचे पाण्यावर तरंगणारे एक आकर्षक घर तयार केले. स्वतःच्या या उपक्रमामुळे या व्यक्तीला आता ‘कोस्टलाइन’ हे टोपणनाव मिळाले आहे.

Advertisements

चीनच्या नवोन्मेषी उद्योजकाला या घराच्या निर्मितीसाठी 4 लाख युआन म्हणजेच 45 लाख रुपयांचा खर्च आला आहे. त्यांनी हे घर फुजियान प्रांताच्या समुद्र किनाऱयावर तयार केले आहे. घर तयार करणाऱया व्यक्तीचे जीवन समुद्र किनाऱयानजीकच गेले आहे. हा व्यक्ती स्वतःचा बहुंताश काळ मासेमारी आणि डॉन्गशान काउंटी येथून सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहत घालवत होता. दक्षिण चीन समुद्र पाहताना अनेकदा त्यांच्या कल्पनांनी भरारी घेतली होती.

2018 मध्ये एका आर्किटेक्ट मित्रासोबत असताना त्यांना तरंगत्या घराची कल्पना सुचली. त्याच रात्री या दोघांनी तरंगते घर तयार करण्याचा निर्णय घेतला. कोस्टलाइन आणि त्यांच्या मित्राने मोठय़ा राफ्टमधून प्रेरणा घेत मेंशनचा बेस तयार केला. ते दोघेही याच घरात स्थलांतरित होऊ इच्छित होते. अशा स्थितीत त्यांनी 600 चौरस फुटांचे मोठे घर तयार करण्याचा विचार केला. लाटांपासून वाचण्यासाठी त्यांनी घराला ओपन सी तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे तरंगते आलिशान घर 16 मेटल अँकर्सद्वारे उभारण्यात आले आहे. या घराचे वजन 1 टन  आहे.

घर उभारताना सर्वात मोठी अडचण प्लॅटफॉर्मचे वरखाली होत राहणे होते. जोरदार वाऱयामुळे ही समस्या अधिकच वाढत होती. घरात स्टील आणि काचेचा भरपूर वापर व्हावा अशी त्यांची इच्छा होती. पण समस्या पाहता त्यांना याप्रकरणी तडजोड करावी लागली. वीजेच्या समस्येवर उपाय शोधण्याकरताच त्यांना वर्षभराचा कालावधी लागला.

2019 मध्ये तयार झालेले हे घर उत्तम व्हेकेशन प्लेस आहे. येथून समुद्राचे सुंदर दृश्य चहूबाजूने दिसते. महामारीदरम्यान कोस्टलाइनने कुटुंबाला आयसोलेट करण्यासाठी या जागेचा वापर केला. आता हे घर चीनमधील पहिले तरंगते हॉटेल ठरले आहे. येथील सेवा मिळविण्यासाठी आगावू बुकिंग करावे लागते.

Related Stories

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त दत्तमंदिरात ५०० किलो फळ व भाज्यांची आरास

prashant_c

मंडई म्हसोबा मंदिर उत्सव : दाक्षिणात्य पद्धतीची आकर्षक पुष्पसजावट

Rohan_P

भूगर्भात सातत्याने बाहेर येतेय पाणी

Patil_p

‘दगडूशेठ’ च्या श्रीं ची प्रतिष्ठापना आणि ऑनलाईन उत्सव शनिवारपासून

Rohan_P

तांदूळ आणि डाळींमधून साकारला भारताचा तिरंगी नकाशा

Rohan_P

2 कोटींमध्ये विकला जाणार जगाचा पहिला एसएमएस

Patil_p
error: Content is protected !!