तरुण भारत

बजाज ऑटोचा पहिला इलेक्ट्रिक प्लांट पुण्यात

नवी दिल्ली

 ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी बजाज ऑटो इलेक्ट्रिक दुचाकीसाठी पुण्यातील आकुर्डी येथे नवा कारखाना सुरू करणार असल्याचे समजते. यायोगे येणाऱया काळात इलेक्ट्रिक दुचाकींच्या निर्मितीवर कंपनी भर देणार असल्याचे सांगण्यात येते.

Advertisements

आकुर्डीत आपला नवा कारखाना स्थापित करून तेथे दुचाकी, तिचाकी वाहनांची निर्मिती केली जाणार आहे. हा नवा कारखाना कंपनीचा चौथा असणार आहे. यापूर्वी चाकण प्रकल्पातून क्रिस्टल ही स्कूटर निर्मिती होऊन बाहेर पडली होती. नव्या कारखान्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर कंपनी विचार करते आहे. बजाजच्या ताफ्यात सध्या एकच ‘चेतक’ ही इलेक्ट्रिक दुचाकी आहे. हस्कवर्णा ब्रँडअंतर्गत इलेक्ट्रिक मॉडेल विकसित करण्याच्या कार्यात कंपनी गुंतली असून स्वतःचीही गाडी विकसित करण्याप्रती कंपनी कटिबद्ध आहे.

Related Stories

‘टाटा’च्या सुपरऍपचे लवकरच सादरीकरण

Patil_p

आर्थिक वृद्धीदर 12.8 टक्क्यावर राहण्याचे संकेत

Amit Kulkarni

चुकीच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्यास काळजी नको!

Patil_p

कोरोना रुग्णांसाठी आरोग्य विमा दाव्यांच्या नियमात बदल हवा

Omkar B

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये इंधन मागणी वाढण्याचे संकेत

Patil_p

भारतीय सूत जगात सर्वात स्वस्त, निर्यात-

Patil_p
error: Content is protected !!