तरुण भारत

शेअर बाजारात मोठी घसरण

गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले

मुंबई

Advertisements

भारतीय शेअरबाजारात सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांमध्येमोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1100 अंकांनी कोसळला तर सोबत निफ्टीही 348 अंकांच्या पडझडीसह बंद झाला. दरम्यान 7 महिन्यानंतर शेअर बाजारात एवढी मोठी घसरण दिसली असून गुंतवणूकदारांचे सुमारे 8 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

सोमवारी शेअरबाजार सलग चौथ्या दिवशी घसरणीत राहिला. यावर्षाच्या एप्रिलनंतर पहिल्यांदाच एक दिवसात बाजाराची एवढी मोठी घसरण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजच्या समभागात झालेली घसरण व जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरणाचा प्रभाव शेअर बाजारावर राहिला. या घसरणीचा फटका बाजारातील गुंतवणूकदारांना मोठय़ा प्रमाणात बसला. एकाच दिवसात 7.86 लाख कोटी रुपये गुंतवणूकदारांचे बुडाले आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग सोमवारी नुकसानीत होते.

कृषी कायदे मागे घेतल्याचा परिणाम सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागावर दिसला. त्याचप्रमाणे आयपीओत पैसा गुंतवलेल्यांनाही अनेक अडचणी झेलाव्या लागल्या. पेटीएमने तर तमाम गुंतवणूकदारांची निराशा केली. त्याचप्रमाणे महागाईमुळे मागणी प्रभावित झाल्याने त्याचे पडसादही बाजारावर उमटले. त्यामुळे बाजारात सोमवारी निराशादायी वातावरणाचाच कल शेवटपर्यंत राहिला. सोमवारी सरतेशेवटी सेन्सेक्स 1170 अंकांनी आणि निफ्टी 348 अंकांनी घसरला होता. दुसरीकडे युरोपसह इतर देशात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे निर्बंध लादले जात असल्याने जागतिक बाजारामध्ये नकारात्मक वातावरण होते. त्याचाच प्रभाव भारतीय शेअरबाजारावर दिसला. सेन्सेक्समधील प्रमुख 30 पैकी 27 कंपन्यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले. बाजार भांडवलात 10 लाख कोटी रुपयांची घसरण दिसून आली.

Related Stories

भारतात कोरोनाबळींची संख्या 50 हजारांवर

datta jadhav

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती होईल

prashant_c

भारतात 65 लाखांहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

datta jadhav

खासदार संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ

Abhijeet Shinde

कोवॅक्सिनच्या लहान मुलांवरील चाचणीचा डेटा DCGI कडे

datta jadhav

अहमदाबादमध्ये विनामास्क फिरणाऱयांना तीन वर्ष कारावास

Patil_p
error: Content is protected !!