तरुण भारत

जिल्हय़ात लसीकरण 30 लाखांच्या पार

20 लाख नागरिकांनी पहिला तर 10 लाख नागरिकांनी घेतला दुसरा डोस

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

जिल्हय़ात कोरोना संसर्ग आटोक्यात येत असताना दीपावली आली. दीपावलीत सलग सुट्टय़ा व दीपावलीमुळे लसीकरणाची गती मंदावलेली होती. मात्र, गत सोमवारपासून दैनंदिन 10 हजारांच्या पुढे लसीकरण होवू लागले असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्येने 30 लाखांचा आकडा पार केला आहे. लसीकरणात जिल्हय़ाचा राज्यात पाचवा क्रमांक आहे. दुसरा डोस घेणाऱयांची संख्याही वाढू लागली असून नोव्हेंबरअखेर 100 टक्के लसीकरणासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत.

दीपावलीत आलेल्या सलग सुट्टय़ांमुळे लसीकरणाचा वेग मंदावला होता. मात्र सुट्टय़ा संपताच जिल्हय़ात लसीकरणाला पुन्हा गती आली आहे. पहिला व दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 30 लाख 3 हजार 86 एवढी झालीय. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 19 लाख 98 हजार 41 एवढी असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 10 लाख 5 हजार 45 एवढी झालीय.

जिल्हय़ात कोरोना संसर्ग आटोक्यात आला दैनंदिन मोठय़ा संख्येने होणारी बाधित वाढ थांबलीय. लसीकरणाने सामुहिक प्रतिकार शक्ती वाढत असल्याने प्रशासनाकडून लस घेण्याचे आवाहन केले जात असून ज्यांचा दुसरा डोस आला आहे त्यांनी देखील लस घेवून लसीकरण मोहिमेस सहकार्य करण्याची गरज व्यक्त होत आहे.

27 लाख नागरिकांनी घेतली कोव्हिशिल्ड

जिल्हय़ात पहिल्यांदा कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचे डोस आले. यामध्ये 27 लाख 10 हजार 318 नागरिकांनी कोव्हिशिल्ड लस घेतली आहे. तर 2 लाख 84 हजार 581 नागरिकांनी कोव्हॅक्सिन लस घेतलेली आहे. कोव्हॅक्सिनसह कोव्हिशिल्डही सध्या मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असून आत्तापर्यंत जिल्हय़ातील 15 लाख 12 हजार 306 पुरुषांनी तर 14 लाख 90 हजार 265 महिलांनी लसीचे डोस घेतलेले आहेत.  

वयोगटानुसार असे झालेय लसीकरण

जिल्हा लसीकरणात राज्यात पाचव्या क्रमांकावर असून आजपर्यंत 60 वर्षांच्यावरील 7 लाख 13 हजार 295 नागरिकांनी लस घेतलीय. तर 45 ते 60 वयोगटातील 8 लाख 80 हजार 710 नागरिकांनी लस घेतली असून 18 ते 44 वयोगटात सर्वात जास्त म्हणजे 14 लाख 9 हजार 81 जणांनी लस घेतलेली आहे. आता यातील काहींची दुसरा डोस घेण्याची मुदतही जवळ आली असून त्यानुसार लसीकरण करण्याचे काम सुरु आहे.     

दुसरा डोस घेणाऱयांची संख्या वाढू लागली

कोरोना संसर्ग आटोक्यात आला आहे. मात्र, भविष्यातील धोका टाळण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेण्याची गरज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणेही आवश्यक असले तरी कोरोनाची भीती गेल्याने दुसरा डोस घेणाऱयांचे प्रमाण कमी होते. मात्र, गत आठवडय़ापासून दुसरा डोस घेणाऱयांची संख्याही वाढू लागली आठवडाभरात सुमारे दीड लाखाच्या वर नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. असून शासकीय कार्यालयास सर्व खासगी कार्यालये, हॉटेल्स, सार्वजनिक मॉल, दुकाने येथे वावरणारांना लसीकरण सक्तीचे करण्यात आले आहे.

Related Stories

अवजड वाहन वापराच्या नियमात बदल

Abhijeet Shinde

सातारा : सज्जनगड परिसरात बिबट्याचा वावर

Abhijeet Shinde

वडूथ येथे कोव्हीड उपचार सेंटर उभारणी – आ.शशिकांत शिंदे

Patil_p

सातारा : सह्याद्रीची जैवविविधता समृद्ध

datta jadhav

शेतकरी आंदोलन हिंसक होण्यास मोदी जबाबदार

Patil_p

नागपूर कोर्टाकडून समितला जामीन मंजूर; पण मुंबई पोलिसांकडून अटक

Rohan_P
error: Content is protected !!