तरुण भारत

रत्नागिरी जिल्हा सोमवारी ‘कोरोना शून्य’

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिल्हय़ामध्ये सोमवारी करण्यात आलेल्या 716 कोरोना चाचण्यांमध्ये एकही नवा रूग्ण आढळून आला नाह़ी कोरोनाच्या डेल्टा व्हेरीएंटने धुमाकुळ घातलेला रत्नागिरी जिल्हा आता कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येत आह़े  आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या उपयायोजना व लसीकरण मोहिमेला रत्नागिरीकरांनी दिलेला प्रतिसाद याचे हे यश असल्याचे मानले जात आह़े

Advertisements

 जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी जिल्हय़ात आरटीपीसीआरच्या 557 तर ऍन्टीजेन टेस्टच्या 159 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा या सर्व नमुन्यांचे अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत़ तसेच उपचारात असलेल्या कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे सांगण्यात आले आह़े   आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिल्हय़ाचा पॉ†िझटिव्हीटी रेट 0.00 टक्के इतका आह़े मागील 24 तासात बरे झालेल्या 4 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े एकूण बरे झालेल्यांची संख्या 76 हजार 517 इतकी झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 96.80 इतके आह़े उपचारातील रूग्णांची संख्या आता 44 इतकी असून केवळ 17 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत़

Related Stories

रुर्बन योजनेत अधिकाऱयांचा मनमानी कारभार नडला

Patil_p

चोऱ्यांच्या सत्राने मारुतीनगर वासीय भयभीत

Rohan_P

किल्ला स्पर्धेतून शिवकालीन इतिहासाला उजाळा

Patil_p

शिवाजी रोडवर दिवसाही पथदीप सुरू

Omkar B

वेगा हेल्मेट समूहातर्फे चिमुकल्याला मदतीचा हात

Patil_p

महात्मा गांधी पुरस्कारासाठी ग्रा.पं.ची नावे सरकारकडे

Amit Kulkarni
error: Content is protected !!