तरुण भारत

ऍड.सुधीर चक्हाणांचा कंग्राळी ग्रामस्थांतर्फे सत्कार

कंग्राळी बुद्रुक ग्रामस्थांकडून हृद्य सत्कार : मानले गावकऱयांचे ऋण

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

Advertisements

कंग्राळी बुद्रुक गावचे सुपूत्र व सर्वधर्मियांचे सामाजिक कार्यकर्ते ऍड. सुधीर चक्हाण हे शनिवारी पार पडलेल्या बेळगाव बार असोसिएशनच्या चुरशीच्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी निवडून आले. त्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने व विविध मंडळांच्यावतीने रविवारी त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रारंभी ग्रा. पं. माजी अध्यक्ष गजानन पाटील प्रास्ताविकात म्हणाले, ऍड. सुधीर चव्हाण यांनी बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये उपाध्यक्षपदी निवडून येऊन गावच्या वैभवात मानाचा तुरा खोवण्याचे काम केले आहे. त्यांनी सर्वधर्मियांशी दाखविलेला आदर व मानसन्मानाचा त्यांचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, तानाजी पाटील, राजू मन्नोळकर, दीपक हुरुडे, प्रवीण चव्हाण, युवराज हुद्दार, रामा पाटील आदींच्या हस्ते कंग्राळी बुद्रुक गामस्थांच्यावतीने फेटा बांधून, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी शंकर कोनेरी यांनी, ऍड. चव्हाण यांच्या विजयाचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ऍड. चव्हाण म्हणाले, सर्वधर्मियांनी दाखविलेल्या मतदानरुपी प्रेमामुळे मला विजय मिळविणे शक्मय झाले. आपल्या गावकऱयांनीसुद्धा दाखविलेल्या प्रेमाने मी भारावून गेलो असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ज्ये÷ शेतकरी महादेव पाटील, ग्रा. पं. सदस्य उमेश पाटील, नवनाथ पुजारी, बाबू दोडमनी, ओमकार सोसायटीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, संचालक राजकुमार पाटील, प्रशांत पवार, कृष्णा हुरुडे, सुभाष चिखलकर, राजू आपटेकर, सागर भेकणे, विलास पाटील, पुंडलिक पाटील, गोपाळ पाटील, शिवप्रताप देसाई, मराठी शाळा सुधारणा अध्यक्ष मोहन भैरटकर, सदानंद चव्हाण, वाय. बी. चव्हाण, शंकर चव्हाण, श्रीनिवास चव्हाण यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

उचगाव मराठी साहित्य संमेलन उद्या

Amit Kulkarni

नानावाडी रहिवाशांना पूरस्थितीचा धोका कायम

Patil_p

घटप्रभा- चिकोडी विभागात रेल्वेची गती वाढणार

Patil_p

‘सदाफुली’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात

Amit Kulkarni

मराठा बँकेला 2 कोटी 55 लाखाचा नफा

Amit Kulkarni

विजया हॉस्पिटलतर्फे औषधांचे वितरण

Patil_p
error: Content is protected !!